108 वर्षांच्या आजीचा अखेरचा श्वास, चार नातींचा पार्थिवाला खांदा
गुरूवारी वय वर्ष 108 श्रीमती तानूबाई रामचंद्र चव्हाण माजी सभापती तथा माजी नगरसेविका ज्योती आधाटे यांच्या आजी यांचे वय वृद्धापकाळाने निधन झाले.
सांगली – मयत झाल्यानंतर महाराष्ट्रात (maharashtra) पुरूषांनी खांदा द्यायचा ही परंपरा अद्याप आपल्याला पाहायला मिळते. परंतु काल सांगलीकरांना (sangli) चार नातींनी आजीला खांदा देऊन समाजात एक वेगळा पायंडा पाडला. त्यामुळे संपुर्ण सांगली परिसरात नातीने खांदा दिल्याची चर्चा होती. काल अनेकांनी हे पाहिल्यानंतर क्रांतीकारी निर्णय असल्याचं देखील म्हटलं. वर्ष 108 श्रीमती तानूबाई रामचंद्र चव्हाण (tanubai ramchandra chavan) यांचं काल वृध्दापकाळाने निधन झालं. माजी सभापती तथा माजी नगरसेविका ज्योती आधाटे (jyoti aadhate) यांच्या आजी होत्या. आजीच्या मृत्यूमुळे त्यांचं कुटुंबीय अत्यंत भावूक झालं होतं. त्यावेळी तिथं आजीला नातींनी खांदा द्यायचा असा घरात निर्णय घेण्यात आला. अंत्यविधीला सांगलीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रभावती आधाटे यांनी शिकाली धरली
नुकताच दोन दिवसांपूर्वी जागतिक महिला दिन महाराष्ट्रात उत्साहात साजरा करण्यात आला आणि काल गुरूवारी वय वर्ष 108 श्रीमती तानूबाई रामचंद्र चव्हाण माजी सभापती तथा माजी नगरसेविका ज्योती आधाटे यांच्या आजी यांचे वय वृद्धापकाळाने निधन झाले.आजी च्या दुःखद निधनानंतर नात ज्योती आधाटे, प्रियांका तुपलोंढे, राणी कदम, सुजाता दळवी यांनी आजीला खांदा दिला आणि प्रत्यक्षात मयत तानुबाई चव्हाण यांच्या मुलीने प्रभावती आधाटे यांनी शिकाली धरली होती. क्रांतिकारी बदल म्हणजे त्यांना गॅस दाहिनीमध्ये पार्थिव घेऊन जात असताना पुरुषी खांदा देण्याची परंपरा टाळून चार महिलांनी त्यांच्या मृतदेहाला खांदा दिला. हा एक खूप मोठा क्रांतिकारी बदल सांगलीकारांनी गुरूवारी पाहिला आहे.
क्रांतीकारी बदल
महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेक अशा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये महिलांनी पार्थिवाला खांदा दिला. मुळात पुरूषांनी मृतदेह खांद्यावरून स्मशान भूमीपर्यंत घेऊन जायची प्रथा असताना मात्र अशा घटना आपल्याला पाहायला मिळतात. काल सांगलीत मृतदेहाला खांदा दिल्याचे पाहताच उपस्थितांनी क्रांतीकारक बदल असल्याचे म्हटले आहे.