गणेशोत्सवासाठी गावी जाताय? दोन डोस घेतले असतील तरच रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश, नवी नियमावली जाहीर

गणपतीच्या सिझनमध्ये कोकणात जाणाऱ्या ट्रेन आणि ट्रॅव्हल्सच्या तिकिटी आधीच बुक असतात. पण यंदा गणपतीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही नियम लादण्यात आलेत.

गणेशोत्सवासाठी गावी जाताय? दोन डोस घेतले असतील तरच रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश, नवी नियमावली जाहीर
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 11:30 AM

रत्नागिरीः गणेशोत्सव जसजसा जवळ येतोय, तशी त्याच्या आगमनाचीही जोरदार तयारी सुरू आहे. अनेक गणेश मंडळांनी आतापासूनच गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे एरव्ही गावी कधी न जाणारे चाकरमनीही गणेशोत्सवानिमित्त आवर्जून गावी जातात. त्यामुळेच गणपतीच्या सिझनमध्ये कोकणात जाणाऱ्या ट्रेन आणि ट्रॅव्हल्सच्या तिकिटी आधीच बुक असतात. पण यंदा गणपतीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही नियम लादण्यात आलेत.

? गणेशोत्सवासाठी आता नियमावली जाहीर

रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं गणेशोत्सवासाठी आता नियमावली जाहीर केलीय. त्यामध्ये आता गणेशोत्सवासाठी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने लसीचे दोन डोस पूर्ण झालेले नसल्यास आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. हे रिपोर्ट 72 तासांपूर्वीचे असणे बंधनकारक असणार आहे. पण ज्या व्यक्तीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, अशा व्यक्तीला मात्र हा रिपोर्ट लागू नाही. त्यामुळे डोस पूर्ण झालेली व्यक्ती कोणत्याही रिपोर्टशिवाय जिल्ह्यात प्रवेश करू शकते.

? जिल्ह्यात प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी केली जाणार

तसेज ज्या व्यक्तीकडे आरटीपीसीआर रिपोर्ट नसणार आहे, अशा व्यक्तीची जिल्ह्यात प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे. याशिवाय कोरोना वाढीला निमंत्रण मिळणार नाही, अशी काळजी घेण्याचं आवाहन देखील यावेळी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेय.

? रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी नेमकी नियमावली काय?

? दोन डोस झालेले नसल्यास RTPCR रिपोर्ट बंधनकारक ? 72 तासांपूर्वी करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट ? दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तीला मिळणार जिल्ह्यात प्रवेश! ? जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर मास्क घालणे सक्तीचे ? जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सामाजिक अंतर राखणे आवश्यक ? एकाच ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करण्यास मनाई

संबंधित बातम्या

नवी मुंबईकरांची प्रतीक्षा संपली, मेट्रोच्या चाचणीला सुरुवात, लवकरच प्रवास सुकर होणार

भाजप नगरसेवकाला काळं फासणाऱ्या शिवसैनिकांना अटक आणि जामीनावर सुटका, न्यायालयाबाहेरच सत्कार!

Going to the village for Ganeshotsav? entry to Ratnagiri district only after taking two doses, new rules announced

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.