खासगी ट्रॅव्हल्सवर पोलिसांचा छापा; सोने-चांदीचे साडेतीन कोटी रुपयांचे दागिने जप्त

पोलिसांनी बस बोरगाव पोलीस ठाण्यात आणून ही पोती ताब्यात घेतली. | Gold found in bus

खासगी ट्रॅव्हल्सवर पोलिसांचा छापा; सोने-चांदीचे साडेतीन कोटी रुपयांचे दागिने जप्त
Follow us
| Updated on: Oct 25, 2020 | 10:31 PM

सातारा: पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी पहाटे एका ट्रॅव्हल्सवर छापा टाकत सातारा पोलिसांनी तब्बल 3 कोटी 64 लाख रुपये किंमतीच्या सोने चांदीच्या वस्तू जप्त केल्या आहेत. गोपनीय माहितीच्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानुसार बोरगाव पोलीस ठाण्यातील पथकाने नागठाणे चौकात कोल्हापुरहून आलेली खासगी ट्रॅव्हल्सची थांबवून तिची झडती घेतली. त्यावेळी बसच्या डिकीत 25 गोणी आढळून आल्या. (Satara Police seized gold and silver stock from Private bus)

ही बस बोरगाव पोलीस ठाण्यात आणून ही पोती ताब्यात घेण्यात आली. ही पोती उघडून पाहिली असता 3 कोटी 54 लाख 76 हजार 800 रुपयांची 591 किलोग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि वस्तू मिळाले असून 9 लाख 37 हजार 300 रुपयांचे एकूण 19 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सापडले आहेत.

यामध्ये लाख,गोंडा,दुशीये वेगवेगळे दागिने असे एकुण 2 किलो 150 ग्रॅमचे सोनेसदृश वस्तू आहेत. या गोण्यांविषयी बस चालकाकडे चौकशी केली असता त्याने कोल्हापुर येथील सोनसिंग परमार, अमोल भोसले, मनोजकुमार परमार यांची नावे सांगितली. या तिघांची चौकशी करुन पोलिसांनी या सर्व चांदी सोन्याचे बिल मागितले असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने बोरगाव पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला. सध्या बोरगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

इतर बातम्या:

BUSINEES | सोने आता खरेदी करु की काही दिवस वाट पाहू? गुंतवणूक तज्ज्ञ काय म्हणतात….

मुंबईत वृद्धेची धारदार शस्त्राने हत्या, 19 तोळे सोने लंपास, पुतण्या ताब्यात

प्रियकराला घरी बोलावून सोने-पैसे लुटले, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीसह तिघांना अटक

ब्रम्हनाळ बोट दुर्घटना : बुडालेल्या महिलांचे 25 तोळे दागिने सापडले

(Satara Police seized gold and silver stock from Private bus)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.