माय आता मीच तुझा मुलगा, गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 80 वर्षीय आजींना आधार

आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांकडून दीड लाखांचा मुदत ठेव मुलींच्या नावे ठेवली जाणार आहे. (Gondia District Collector Rajesh Khawale help 80 year grandmother)

माय आता मीच तुझा मुलगा, गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून 80 वर्षीय आजींना आधार
Gondia District Collector Rajesh Khawale
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 3:46 PM

गोंदिया : गोदिंयाचे जिल्हाधिकारी राजेश खवले हे 80 वर्षीय आजीबाईंचे पुत्र झाले आहे. या 80 वर्षीय आजीबाईंच्या दोन अनाथ नातींना जिल्हाधिकाऱ्यांनी मासिक आर्थिक मदत केली आहे. तसेच या आदिवासी प्रकल्प कार्यालय आणि आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांकडून दीड लाखांचा मुदत ठेव मुलींच्या नावे ठेवली जाणार आहे. गोंदियामध्ये राहणाऱ्या 80 वर्षांच्या आजीबाईंनी एकाच वर्षात सून आणि मुलगा गमावला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी पुत्र माय मी तुझ्या घरी आलो ना, मग मीच तुझा मुलगा” असे म्हणत त्यांचे सांत्वन केले. त्यावेळी आदिवासी विभागानेही त्यांना मदत केली. (Gondia District Collector Rajesh Khawale help 80 year grandmother)

वर्षभरात सून आणि मुलगा गमावला

सागनबाई मरस्कोल्हे असे 80 वर्षीय आजींचे नाव आहे. त्या गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील खाडीपार गावात राहतात. सागबाई यांना सूरजलाल नावाचा एक मुलगा होता. गेल्यावर्षी कोरोना काळात त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. तर या वर्षी सागनबाई यांची सून सीमा मरस्कोल्हे हिचाही कोरोनामुळे मृत्यू झाला.

वयोवृद्ध आजींकडून दोन नातींचा सांभाळ

सुरजलाल यांना दोन मुली आहेत. यात मोठी मुलगी वैष्णवी ही चार वर्षाची आहे. तर लहान मुलगी आरती ही 2 वर्षाची आहे. या दोघांचा सांभाळ ही एकटी 80 वर्षीय आजी करते. ही बाब गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले आणि आदिवासी विभागाच्या लक्षात आली. त्यावेळी त्या वयोवृद्ध आजीबाई या वयात कुठे कामाला जाणार आणि नातींचे सांभाळ कसा करणार हे लक्षात आले. त्यावेळी खवले यांनी व्हॉट्सअॅपवर एक ग्रुप तयार केला. यावेळी वरिष्ठ अधिकारी यांच्या एच. ओ. डी. ग्रुप ही बातमी शेअर करताच जिल्हाधिकाऱ्यांसह 20 अधिकारी त्या आजींच्या मदतीला धावून आले.

जिल्हाधिकारी आणि आदिवासी विभागाकडून मदत

यावेळी 20 अधिकाऱ्यांनी प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दर महिन्याला 10 हजार रुपयांची मदत गोळा करुन ती त्या आजीबाईंना देण्याचा निर्णय घेतला. तर आदिवासी प्रकल्प विभाग आणि आश्रमशाळा कर्मचारी यांनी दीड लाख रुपये या दोन्ही चिमुकल्या मुलीच्या नावे बँकेत एफ.डी करून ठेवले. या पैशातून आता या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालणार आहे.

आता मीच तुझा मुलगा, जिल्हाधिकाऱ्यांकडून सांत्वन 

विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मरस्कोल्हे यांच्या घरी जात या आजीबाईचा ही मदत सुपूर्द केली. आजी मी आज तुझ्या घरी मदतीला आलो न मग मीच तुझा मुलगाच क्लेक्टर आहे, असे समजवत जगण्याचा नवा आधार दिला. तर गोंदिया जिल्ह्याच्या आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यलयातील अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येत मरस्कोल्हे कुटूंबियांच्या मदतीला धावून आले .

तर यापुढे गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात आलेला मदतीचं उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवला जाईल. समाजात मदत करणाऱ्या लोकांची कमी नाही. गरजू लोकांची कमी नाही, असे मत जिल्हाधिकारी खवले यांनी व्यक्त केले.

(Gondia District Collector Rajesh Khawale help 80 year grandmother)

संबंधित बातम्या : 

शस्त्रक्रिया करत असतानाच डॉक्टरला हृदयविकाराचा झटका, औरंगाबाद हळहळले

Matheran Unlock | अनलॉक! माथेरानमध्ये होणार पर्यटकांचे आगमन

लहान मुलांसाठी स्वतंत्र बेड, 8 नवे ऑक्सिजन प्लँट, बुलडाणा जिल्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.