सूरतोली वनक्षेत्रात मोराची शिकार करणाऱ्या 5 आरोपींना Gondia वन विभागाकडून अटक
गोंदियातील (Gondia) नवेगावबांध वनपरिक्षेत्रांतर्गत बोरटेकडी सहवन क्षेत्रातील सूरतोली बिट 1 मधील कक्ष क्रमांक 731 संरक्षित वनांमध्ये अवैधरीत्या मोराची (Peacock) शिकार (Hunting) केल्याची घटना 6 मार्च रोजी उघडकीस आली.
गोंदियातील (Gondia) नवेगावबांध वनपरिक्षेत्रांतर्गत बोरटेकडी सहवन क्षेत्रातील सूरतोली बिट 1 मधील कक्ष क्रमांक 731 संरक्षित वनांमध्ये अवैधरीत्या मोराची (Peacock) शिकार (Hunting) केल्याची घटना 6 मार्च रोजी उघडकीस आली. त्यांमुळे वन विभागा शिकाऱ्यांच्या मागावर असताना सूरतोलीचे बिट वनरक्षक रात्रीदरम्यान गस्त घालत असताना, तीन व्यक्ती संशयितरीत्या फिरताना आढळले, तेव्हा त्यांना अडवून त्यांची चौकशी केली असता रासायनिक खताच्या पिशवीपासून बनवलेल्या पिशवीत पाहिले तर एक गळा कापलेला मोर आढळला. त्याच पिशवीत वाघ, बिबट्या यांच्या शिकारीसाठी वापरला जाणारा एक स्प्रिंग आढळून आला असता पंचांसमोर पंचनामा करून आरोपींना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कबूली बयानावरून इतर 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. इटियाडोह धरणाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या एका नाल्यात मोराची शिकार केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे. आरोपींकडून मृत मोर, लोखंडी सापळा, वाघ, बिबट्याच्या शिकारीसाठी उपयोगात आणला जाणारी लोखंडी स्प्रिंग आदी साहित्य जप्त करण्यात आले. पाचही आरोपीविरोधात भारतीय वन अधिनियम 1927 वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.