गोंदियात शिवशाही बसचा अपघात, 11 जणांचा मृत्यू, शासनाकडून 10 लाखांची मदत जाहीर

गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. यात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

गोंदियात शिवशाही बसचा अपघात, 11 जणांचा मृत्यू, शासनाकडून 10 लाखांची मदत जाहीर
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 3:51 PM

Gondia Bus Accident : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. यात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जातआहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात नागपूरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस पलटी झाली. अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की ती शिवशाही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बसच्या काचा फुटल्या आणि आत बसलेले प्रवासी हे खिडकीच्या बाहेर फेकले गेले.

या  दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. गोंदियामध्ये एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत.

मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत

दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्यात आली आहे. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे त्यांनी म्हटले.

चंद्रपुरात भीषण अपघात

तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या बोथली- हिरापूर रोड वरील मार्कंडेय विद्यालयासमोर अपघात झाला. या अपघातात 3 तरुणांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात एक शेतकरी शेतातून काम करुन ट्रॅक्टर रोडच्या कडेला लावून लाईट सुरू ठेवून एका सहकाऱ्याची वाट बघत होता. अचानक एक केटीएम बाईकवरुन ते तिघे भरधाव वेगात आले. याचदरम्यान दुचाकी स्वाराचे संतुलन सुटले आणि त्याने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की एकाचा जागीच मृत्यू झाला. हर्षद दंडावार (18) असे या तरुणाचे नाव आहे. तर साहील कोसमशीले व बाईकवर असलेला तळोदी येथील त्यांचा मित्र साहिल गणेशकर गंभीर जखमी झाले. त्या दोघांना गडचिरोलीच्या रुग्णालयात नेत असताना साहिलचा वाटेतच मृत्यू झाला. तर साहिल कोसमशील या तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. हे तिघे नाटक बघण्यासाठी जात होते, असे बोललं जात आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.