आईसोबत शेळ्या राखायला गेला, तिथून तो आईला दिसलाच नाही; प्रवीणबाबत नेमकं काय घडलं?
या धक्क्यातून ती सावरली नाही. कारण मुलाचे कपडे आणि चप्पल नदीच्या काठावर होती. पण, प्रवीण काही दिसला नाही.
गोंदिया : प्रवीण हे तेरा वर्षांचा मुलगा. घरात पालकांना कोणत्याही कामात मदत करणारा. काल तो आईसोबत शेळ्या राखायला गेला. बाजूला नदी असल्याने त्याठिकाणी आंगोळ करण्याचा मोह त्याला झाला. त्याने आईला सांगितलं. आई मी आंघोळ करून येतो. आईने होकार दिला. प्रवीण नदीत आंघोळ करायला केला म्हणून आई निश्चिंत होती. पण, बराच वेळ होऊन तो परत आला नाही. त्यामुळे आईच्या मनात भीती वाटली. ती प्रवीणला पाहण्यासाठी गेली. तेव्हा तिला फार मोठा धक्का बसला.
या धक्क्यातून ती सावरली नाही. कारण मुलाचे कपडे आणि चप्पल नदीच्या काठावर होती. पण, प्रवीण काही दिसला नाही. त्यावेळी तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने जोरजोराने आवाज दिला. पण, प्रवीणपर्यंत तो आवाज पोहचला नाही. आजूबाजूचे लोकं जमा झाले.
नदीवर आंघोळीसाठी गेला
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील ही घटना. प्रवीण हंसराज लांजेवार (वय 13 वर्षे) हा आपल्या आईसोबत शेळ्या राखायला गेला. शनिवारला चार वाजता आपल्या आईला म्हटले की मी नदीवरून आंघोळ करून येतो. परंतु तो काही वेळापर्यंत परत आला नाही.
नदीकाठावर कपडे, चप्पल दिसली
प्रवणीची आई नदीकडे त्याला पाहायला गेली. त्याचे कपडे आणि चप्पल नदीकाठी ठेवलेली होती. तो कुठेही दिसला नाही. तेव्हा त्याची आई घाबरली. आजूबाजूला शेतात असलेल्या काही लोकांना बोलावले. नंतर घरच्या लोकांना माहिती दिली.
रात्री उशिरा मृतदेह काढला
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहोचले. नदीपात्रात गावकऱ्यांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत मृतदेह आढळला. आमगाव पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रवीणचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने प्रवीणच्या आईवर फार मोठा आघात बसला.
आईने फोडला टाहो
नदीच्या काठावर कपडे पाहून प्रवीणची आई हादरली. तो आंघोळ करायला गेला. पण, आता आवाज देऊनही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे आईने टाहो फोडला. जोराजोराने आवाज देऊ लागली. पण, त्याच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही.