सकाळी सकाळी मोठ्या उत्साहात मित्राला भेटण्यासाठी निघाला पण रस्त्यातच मृत्यूने गाठलं

तरुण नागपूर येथे अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होता. सुट्टीनिमित्त गोंदियात गावी आला. गावी आल्यानंतर मित्राला भेटायला घरुन गेला, तो पुन्हा परतलाच नाही. यानंतर घरी थेट त्याचा मृतदेहच आला.

सकाळी सकाळी मोठ्या उत्साहात मित्राला भेटण्यासाठी निघाला पण रस्त्यातच मृत्यूने गाठलं
गोंदियात कार अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 9:45 AM

गोंदिया / शाहिद पठाण : मित्राला भेटायला चाललेल्या तरुणाचा रस्त्यातच दुर्दैवी अंत झाल्याची घटना गोंदियात आज सकाळी घडली. कारने मित्रासोबत जात असताना भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतात पलटी झाली. यानंतर कारमधील तरुण बाहेर फेकला अन् गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. यात कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. गोंदिया जिल्हाच्या अर्जुनी मोरगाव-नवेगांवबांध मार्गावर माँ पेट्रोल पंप परिसरात ही घटना घडली. डेव्हिड धनराज रहिले असे मयत तरुणाचे नाव आहे. तर वैभव उमेश राजाभोज असे कार चालकाचे नाव आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता तरुण

डेव्हिड रहिले हा तरुण नागपूर येथील प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तीन दिवसापूर्वीच तो सुट्टीनिमित्त अर्जुनी मोरगावला आपल्या गावी आला होता. गावातीलच त्याचा मित्र वैभव उमेश राजाभोज याने त्याला सकाळीच भेटण्यासाठी बोलावले होते. तो वैभवला भेटला. मग दोघे जण त्यांच्याकडील चारचाकी वाहनाने निघाले. वैभव हा कार चालवत होता, तर डेव्हिड शेजारी बसला होता.

कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

दरम्यान त्यांनी अर्जुनी मोरगाव -नवेगांवबांध मार्गावरील माँ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. तिथून भरधाव वेगाने नवेगांवबांधकडे जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणी रस्त्यावरच्या दिशादर्शक फलकाला तोडून शंभर फूट चारचाकी उलटत गेली. सदर गाडीतून मृतक हा फुटबॉलसारखा गाडीपासून 60 ते 70 फुटांवर जाऊन पडला. यात तो जागीच ठार झाला.

हे सुद्धा वाचा

अर्जुनी मोरगाव पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. डोव्हिडचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाचा पंचनामा करत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.