महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी होणारी प्रतापगडची यात्रा रद्द, गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे आदेश

महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivaratri) गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथे यात्रा भरते. परंतु, यंदा ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी यात्रा रद्द केल्याचे आदेश काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी होणारी प्रतापगडची यात्रा रद्द, गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे आदेश
गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगडच्या डोंगरावरील शंकराची मूर्ती. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 12:00 PM

गोंदिया : सद्यास्थितीत जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. रुग्णांची संख्या कमी दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रतापगडची यात्रा (Yatra of Pratapgad in Gondia District) प्रसिद्ध आहे. इतर धार्मिक व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी 1 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त यात्रा राहते. पण, यंदा ही यात्रा झाल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कोविड-19 या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता महाशिवरात्री (Mahashivaratri) निमित्त गोंदिया जिल्ह्यात आयोजित सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नयना गुंडे (Collector Nayana Gunde ) यांनी निर्गमित केले आहेत.

नियमाचे पालन न केल्यास कारवाई

कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये 13 मार्च, 2020 पासून लागू करण्यात आला. खंड 2, 3 व 4 मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली आहे. जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले आहे. या अधिकारात यात्रा रद्द आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशाचे पालन न करणारी अथवा उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भरतीय दंड संहिता 1860 नुसार अपराध केला असे मानन्यात येईल. नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पाच दिवस भरते यात्रा

महाशिवरात्री निमित्त जिल्ह्यातील धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ या ठिकाणी तसेच प्रामुख्याने तालुका अर्जुनी मोरगाव अंतर्गत प्रतापगड येथे सलग 5 दिवस महाशिवरात्री व ख्वाजा उस्मान गनी हारुनी उर्सकरिता यात्रा भरत असते. या यात्रेमध्ये दरवर्षी यात्रा कालावधीत बाहेर जिल्हा व राज्यातून दररोज हजारोच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळं या ठिकाणी गर्दीचे स्वरुप हे मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथे यात्रा भरते. परंतु, यंदा ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी यात्रा रद्द केल्याचे आदेश काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नागपूर कट्टा, बॉटनिकल गार्डनसाठी शोधताहेत फूलं!

नानाजी देशमुख यांची आज पुण्यतिथी, भारतरत्न पुरस्काराने करण्यात आले होते सन्मानित

नागपूर जिल्ह्यात आज पल्स पोलिओ मोहीम, किती बालकांचे होणार लसीकरण?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.