Nitin Gadkari | 349 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन, गोंदियात सहा महिन्यांत मेट्रो ट्रेन धावणार; नितीन गडकरींच्या आणखी कोणत्या घोषणा…

| Updated on: May 29, 2022 | 5:20 PM

गोंदिया शहरात गड्डाटोली येथे रेल्वे उडान पुल, गोंदिया शहरात बस स्तानकापासून कटंगीपर्यंत (Katangi) रेल्वेवर उडान पुल बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याकरिता अनेक विकासाच्या योजना त्यांनी घोषित केल्या.

Nitin Gadkari | 349 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन, गोंदियात सहा महिन्यांत मेट्रो ट्रेन धावणार; नितीन गडकरींच्या आणखी कोणत्या घोषणा...
349 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन, गोंदियात सहा महिन्यांत मेट्रो ट्रेन धावणार
Follow us on

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 349.24 कोटी रुपये किमतीच्या रस्ता व उडान पुल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) एकाच मंचावर उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गोंदिया जिल्ह्यमध्ये आज नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 आमगाव (Amgaon) ते गोंदिया 22 किलोमीटर सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच किडगीपर येथे रेल्वे उडान पुल, गोंदिया शहरात गड्डाटोली येथे रेल्वे उडान पुल, गोंदिया शहरात बस स्तानकापासून कटंगीपर्यंत (Katangi) रेल्वेवर उडान पुल बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्याकरिता अनेक विकासाच्या योजना त्यांनी घोषित केल्या.

नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणा

  1. महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र सरकारने पैसे घेतले
  2. गोंदिया जिल्ह्यात सहा महिन्यांत मेट्रो ट्रेन धावणार
  3. गोंदिया शहराला चारही बाजूने रिंग रोड तयार करणार
  4. रशिया युक्रेन युद्धामुळं भारताचा फायदा झाला पाहिल्यांदा तांदूळ एक्स्पोर्ट वाढले
  5. हे सुद्धा वाचा
  6. विदर्भाच्या कापसाला बांगलादेशात मागणी वाढली. त्यामुळे विदर्भाचा विकास होणार
  7. गोंदिया शहराला स्मार्ट सिटी बनविणार
  8. मला साखर कारखान्यात फायदा झाला. जे लोक पाप करतात त्यांच्या नशिबी साखर कारखाने येतात.
  9. 35 तलावांच्या बांधकाम आणि नद्यांचे खोलीकरण करण्यात आले.