“कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपचा काहीही करू शकत नाहीत”; भाजपने विरोधकांच्या आघाडीला उडवून लावलं…
बाळासाहेब आंबेडकर म्हणजे भीमशक्ती नाही तर आमच्याकडे सुध्दा भीमशक्ती असल्याची खोचक टीका त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यामुळं आम्ही 51 टक्यांची तयारी केली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
गोंदिया:गेल्या काही दिवसांपासून राज्यात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात लावण्यात आलेल्या तैलचित्रावरूनही राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर आता आणि तिसऱ्या आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे भाजपने महाविकास आघाडीला डिवचले आहे.
असे कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपचं काहीही करू शकत नाहीत आणि भाजपला त्याचा काहीही फरक पडून शकत नाही असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
सध्याच्या काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडी पक्षासोबात कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपला काहीही फरक पडणार नाही आणि भाजपचं ते एकत्र येण्यानं काहीही करू शकत नाहीत असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. कालपासून शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
पण बाळासाहेब आंबेडकर म्हणजे भीमशक्ती नाही तर आमच्याकडे सुध्दा भीमशक्ती असल्याची खोचक टीका त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. त्यामुळं आम्ही 51 टक्यांची तयारी केली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत कितीही पक्ष एकत्र आले तरी भाजपला कोणताही त्याचा फरक पडणार दिसून येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत एक नाही दोन नाही कितीही पक्ष आले तरी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दोन सरदार महाराष्ट्राला मिळाले आहेत असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जयंत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली. आता 40 अमदार निवडून आले मात्र यापुढे सहाही आमदार निवडून येणार नाहीत असा टोला जयंत पाटील यांनी भाजपाला लगावला होता.
त्यावर उत्तर देत भाजपा प्रदेशध्याक्ष यांनी सांगितले की त्यावेळेस त्यांचीच सत्ता होती मग 40 आले आता तर आम्हीच सत्ता आहे. मग विचार करा, आणि आता जर बहुमत सिद्ध करायचे झाले तर 184 आमदार होतील, राष्ट्रवादीचे आमदारसुध्दा येथील मग त्यांच्याकडे किती उरतील असा टोला बावनकुळे यांनी जयंत पाटील यांना लगवाला आहे.