Gondia School : गोंदियात भरणार दप्तर मुक्त शाळा, शिक्षण विभागाचा उपक्रम नेमका काय?
आठवड्यातून एकदा दप्तराच्या ओझ्यापासून मुक्तता देण्यात येत आहे. प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम प्रभाविपणे राबवण्यात येत आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Self-Government) शाळांमध्ये आठवड्यातील प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील (Anil Patil) यांनी आदेश काढलेत. विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी व भविष्यात विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होऊ नये. तसेच विद्यार्थ्यांना शारीरिक सर्व व खेळामध्ये रुची वाढणार आहे. त्यामुळे अभ्यासाच्या तणावात असणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी स्वागत केले आहे.
शिकण्यासाठी ताण व चांगले वातावरण मिळायला हवे. यासाठी दप्तर मुक्त दिन आठवड्यातून एक दिवस शनिवारी साजरा करण्याचे ठरविण्यात आले. जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे एक दिवस का होईना कमी होणार आहे.
प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शाळा
पाठ्यपुस्तक व दप्तरातील साहित्याच्या पलीकडे जाऊन त्यांना शाळेत, शाळेच्या परिसरातील उपलब्ध साधन सामुग्री मधूनही विविध विषयातील ज्ञान अवगत करता येते. याकरिता त्यांना आठवड्यातून एकदा दप्तराच्या ओझ्यापासून मुक्तता देण्यात येत आहे. प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम प्रभाविपणे राबवण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना हे करता येणार
या उपक्रमात कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव या विषयांना प्राधान्य देण्यात येते. शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यात यावी. परिपाठ, योगासने, कवायत, वाचन, कार्डाव्दारे प्रकट वाचन, वैयक्तिक, सामूहिक मराठी, इंग्रजी व हिंदी कविता गायन, विविध खेळाच्या स्पर्धा, नृत्यस्पर्धा, सामान्यज्ञान यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती पालक विलास शिंदे व संजू बापट यांनी दिली.