Gondia Nagar Panchayat | देवरी, सडक अर्जुनी नगरपंचायतीत अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव; तर मोरगाव अर्जुनीमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण कुणाला?
गोंदिया जिल्हातील 3 नगरपंचायतीचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. देवरी, सडक अर्जुनी नगरपंचायतीत अनुसूचित जमाती सर्वसाधारण राखीव; तर मोरगाव अर्जुनीमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण खुला प्रवर्ग ( महिला ) राखीव जाहीर झाले आहे.
गोंदिया : राज्यातील 139 नगरपंचायतींचे आरक्षण (Nagar Panchayat ) जाहीर झाले. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी या तिन्ही नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले आहे. देवरी आणि सडक अर्जुनी येथे अनुसूचित जमाती ( सर्वसाधारण ) राखीव (Scheduled Tribes General Reserved), तर मोरगाव अर्जुनी येथे खुला प्रवर्ग ( महिला ) राखीव आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर संभाव्य उमेदवारांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देवरी तालुक्यात भाजपकडे 3 उमेदवार अनुसूचित जमातीमधून निवडूण आले आहेत. तर सडक अर्जुनीमध्ये राष्ट्रवादीचे 2 उमेदवार अनुसूचित जमातीमधून निवडणूक आले आहेत. मोरगाव अर्जुनीमध्ये भाजप की महाविकास आघाडी सत्ता स्थापन करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आता या तिन्ही नगरपंचायतीमध्ये अध्यक्षपदासाठी चुरस वाढणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम (Presidential election program) जाहीर झाल्यावर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष बनेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
देवरीत भाजपचे तीन नगरसेवक रेसमध्ये
देवरी नगरपंचायतीमध्ये भाजपाचे 11 नगरसेवक निवडूण आलेत. काँग्रेसचे 4 तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडूण आले आहेत. भाजपा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळं नगराध्यक्षपदी भाजपचाच नगरसेवक बसेल, हे नक्की. तीन उमेदवार अनुसूचित जमातीचे आहेत. यापैकी कोणाला संधी मिळते, हे पाहावे लागेल.
सडक अर्जुनीत अपक्ष ठरविणार नगराध्यक्ष
सडक अर्जुनी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 नगरसेवक निवडूण आलेत. काँग्रेसला 2, तर भाजप आणि शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. अपक्षांनी मात्र 6 जागा पटकावल्या. त्यामुळं येथे सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्षांचा कल महत्त्वाचा ठरणार आहे.
मोरगाव अर्जुनीत सत्ता भाजप की, महाविकास आघाडीची?
मोरगाव अर्जुनी नगरपंचायतीमध्ये भाजपचे 7 नगरसेवक निवडूण आले. काँग्रेसचे 4 आणि राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक निवडूण आलेत. शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले. अपक्ष फक्त एकच निवडूण आला. त्यामुळं सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच अपक्ष आणि शिवसेनाही महत्त्वाची ठरणार आहे.