Devendra Fadnavis : फडणवीसांच्या बॅनरवरून भाजपच गायब, फक्त फडणवीसांचा देवमाणूस असा उल्लेख, गोंदियात नेमकं काय घडलं?

नंतर फंडणवीसांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. त्याचेच परिणाम आता गोंदियात दिसून आलेत का? असा सवाल विचारण्यात येतोय आणि त्याला कारण ठरलेत गोंदियात लागलेले हे बॅनर...

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या बॅनरवरून भाजपच गायब, फक्त फडणवीसांचा देवमाणूस असा उल्लेख, गोंदियात नेमकं काय घडलं?
फडणवीसांच्या बॅनरवरून भाजपच गायबImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 5:03 PM

गोंदिया : राज्यात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतरामध्ये सर्वात मोठा रोल कोणी बजावला असेल तर तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) , एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी वेळोवेळी बैठका घेऊन, अगदी काटेकोर प्लॅनिंग करून, त्यांनी आणि एकनाथ शिंदे यांनी बंड यशस्वी करत ठाकरे सरकार (Udhav Thackeray) पाडून दाखवलं. तसेच नवं सरकारी स्थापन करून दाखवलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी खुद्द एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपासून लांब राहणे पसंत केले. मात्र पक्षाच्या आदेशावरून त्यांना उपमुख्यमंत्री पदी विराजमान व्हावं लागलं. आधी फक्त एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र त्याचवेळी फडणवीसांचाही शपथविधी झाला. मात्र नंतर फंडणवीसांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली. त्याचेच परिणाम आता गोंदियात दिसून आलेत का? असा सवाल विचारण्यात येतोय आणि त्याला कारण ठरलेत गोंदियात लागलेले हे बॅनर…

गोंदियांत नेमकं काय घडलं?

गोंदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून एकटे अमित शाहच नव्हे तर कमळासह पूर्ण भाजपच गायब करण्यात आले असून फक्त देवेंद्र फडणवीस यांचा देवमाणूस म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर फडणवीस यांचे खंदे समर्थक विधान परीषद सदस्य परिणय फुके यांनी गोंदिया शहरात जागो-जागी लावले आहेत. तर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. त्यामुळे मुख्यमंत्री तेच होणार नाही अशी चर्चा असताना ऐनवेळी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज झाले होते. ही नाराजी आज पुन्हा एकदा गोंदियात पाहायला मिळाली आहे.

फडणवीसांचे कार्यकर्ते नाराज

गेल्या विधानसभेवेळी प्रत्येक सभेत फडणवीस ओरडून सांगत होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मात्र शिवसेनेने अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत  महाविकास आघाडी स्थापन केल्याने फडणवीसांचं ते पुन्हा येण्याचं स्वप्न अडीच वर्षांपूर्वी अर्ध राहिलं. आता एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि भाजप शिंदे गटाची युती झाल्यानंतर फंडणवीसांचं ते स्वप्न पूर्ण होईल, असं अनेक कार्यकर्त्यांना वाटत होतं. मात्र यावेळी ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांना ही गोष्ट पटली नाही. त्यातूनच काही ठिकाणी असे नाराजीचे उमटत आहेत. या बॅनरचा सूरही तसाच काहीसा असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.