Gondia Cycling : भारतभ्रमंतीवर निघालेल्या दिलीपचे गोंदियात स्वागत, 21 हजार किलोमीटर सायकलिंगचा टप्पा केला पार

शिवाय भारतीयांना निरोगी व फिट राहण्याविषयी जागरूक करीत आहे. यात्रेच्या निमित्ताने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनेस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी तो प्रयत्न करणार आहे.

Gondia Cycling : भारतभ्रमंतीवर निघालेल्या दिलीपचे गोंदियात स्वागत, 21 हजार किलोमीटर सायकलिंगचा टप्पा केला पार
Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 3:21 PM

गोंदिया : महापालिकेतील धरमपेठ झोनमध्ये दिलीप मलिक (Dilip Malik) हे स्वच्छता कर्मचारी आहेत. दिलीपने 26 जानेवारी रोजी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधीच्या पुतळ्यापासून सायकल यात्रेला सुरुवात केली. 45 हजार 711 किमी अंतराची अशी ही भारत भ्रमंती (tour of India) आहे. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, दिल्ली, उत्तरप्रदेश, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेशमार्गे ओलांडला. 21 हजार 250 किमीचा पहिला टप्पा 7 महिने 5 दिवसांत पूर्ण केला.

उपराजधानीत नागपूर येथून पुन्हा दुस-या टप्प्यासाठी निघाला. तो आज गोंदियात येथे पोहचला. गोंदिया येथे त्यांचा स्वागत सायकलिंग संडे द्वारा ‘डोल ताश्याच्या गजरात करण्यात आले. तसेच अनेक सामाजिक संघटनांनी दिलीप मलिकचं स्वागत केलं. दिलीप आपल्या पुढच्या प्रवासासाठी दक्षिण भारताकडे पुन्हा रवाना झालेला आहे.

या यात्रेदरम्यान तो दिवसरात्र सायकल चालवतो. सायकलवर तिरंगा झेंडा लावलाय. पाठीवर 15 किलोचे ओझे आहे. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, ढाबा किंवा मिळेल त्या ठिकाणी जेवण करतो. गरजेनुसार, विश्रांती घेऊन पुढील प्रवासाला सुरवात करतो. उर्वरित तीन टप्प्यांमध्ये भारतातील इतर राज्ये कव्हर करणार असल्याचे त्याने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

एकूण चार टप्प्यात होणारी ही सायकल यात्रा 13 ते 15 महिन्यांत पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. 31 मार्च 2023 पर्यंत नागपूरला परतण्याचा दिलीपचा प्रयत्न आहे. 51 वर्षीय दिलीप या सायकल यात्रेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देतो. झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ इत्यादीचाही संदेश देत आहे.

शिवाय भारतीयांना निरोगी व फिट राहण्याविषयी जागरूक करीत आहे. यात्रेच्या निमित्ताने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि गिनेस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी तो प्रयत्न करणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.