मनीषा कायंदे यांच्यावर ठाकरे गटाचा गंभीर आरोप; कायंदे म्हणतात, हा तर माझ्याविरोधातील कट

14 जूनला तेजराम मोटघरे यांनी मनीषा कायंदे यांना फोन केला. तेव्हा त्यांनी याविषयी त्यांच्या स्वीय सहाय्यक राजीव केळकर यांच्याशी सविस्तर बोलायला सांगितले.

मनीषा कायंदे यांच्यावर ठाकरे गटाचा गंभीर आरोप; कायंदे म्हणतात, हा तर माझ्याविरोधातील कट
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 7:30 PM

शाहीद पठाण/गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, गोंदिया/मुंबई : गोंदिया जिल्ह्यात एक सध्या ऑडिओ क्लिप मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. ती ऑडिओ क्लिप शिवसेना नेता मनीषा कायंदे यांची आहे. कायंदे यांनी 19 जूनला ठाकरे गटातून शिंदे गटांमध्ये प्रवेश केला. या ऑडिओ क्लिपमध्ये गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा उपप्रमुख तेजराम मोरघडे यांच्याशी एका सामाजिक भवनाच्या बांधकामासाठी 15 लाख रुपये निधी देण्याचे मान्य करण्यात आले. त्या कामानिमित्त दहा टक्केचे प्रीमियम देण्यात यावं. यासंबंधी त्यांचे स्वीय सहाय्यक राजीव केळकर यांच्याशी ऑडिओ क्लिपमध्ये सवांद झाला आहे.

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे या सहा महिन्यांपूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा उपप्रमुख तेजराम मुरगडे यांनी एका कामासंबंधी मनीषा कायंदे यांना निवेदन दिलं होतं. त्याचा पाठपुरावा त्यांनी सुरू ठेवला होता. 14 जूनला तेजराम मोटघरे यांनी मनीषा कायंदे यांना फोन केला. तेव्हा त्यांनी याविषयी त्यांच्या स्वीय सहाय्यक राजीव केळकर यांच्याशी सविस्तर बोलायला सांगितले.

दहा टक्के प्रीमियम रकमेची मागणी

तेजराम यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचे स्वीय सहाय्यक राजीव केळकर यांना फोन केला. त्यांनी पंधरा लाख रुपये मनीषा कायंते यांनी मंजूर करायचे सांगितले आहे. तेव्हा तेजराम यांनी थोडा निधी वाढवून द्या, अशी विनंती केली. त्यावेळी स्वीय सहायक यांनी 18 लाख रुपयापर्यंत निधी वाढवता येईल. मात्र या 18 लाखांच्या कामाचे दहा टक्के प्रीमियम रक्कम तुम्हाला द्यावे लागेल, असं सांगितलं. हा सर्व वार्तालाप तेजराम मोटघरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवला.

तेजराम हे 17 जूनला मुंबई येथे गेले असता मनीषा कायंदे आणि त्यांच्याशी सहाय्यकाचे मोबाईल बंद असल्याचे माहीत झाले. 19 जूनला मनीषा कायंदे यांनी शिवसेनेच्या शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार आहेत, असं कळलं. त्यांनी हा सर्व संवाद आपल्या संपर्क प्रमुखांना पाठवलं, असं तेजराम मोटघरे यांनी सांगितले.

ठाकरे गटाकडून मला फसवण्याचा प्रयत्न

यासंदर्भात बोलताना मनीषा कायंदे म्हणाल्या, मलादेखील ही कथेत ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर धक्का बसला. मी शिंदे गटामध्ये आल्यानंतर त्यांनी माझ्या विरोधामध्ये एक कट कारस्थान केलेलं आहे. माझ्यासोबत काम करणाऱ्या त्या व्यक्तीला निलंबित केले आहे. अशा कुठल्याही पद्धतीचे समर्थन मी करणार नाही आणि केलेलं नाही. मला सूड भावनेतून फसवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जात असल्याचा आरोपही कायंदे यांनी केला.

संजय राऊत काहीही बोलू शकतात

संजय राऊत हे काहीही म्हणू शकतात. त्यांच्या बोलण्याला काही महत्त्व नाही. ठाकरे गटातून शिंदे गटांमध्ये आल्यानंतर बऱ्याचश्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. बरेच टोमणे ऐकावे लागले. पण तिथे ठाकरे गटात कुठलीही काम होत नाहीत. इथे काम होत आहेत हे एक दिवस लोकांनाही कळेल, असंही मनीषा कायंदे यांनी म्हंटलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.