Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा परिषदेतील मुलं हायटेक, तंत्रज्ञानाचा वापर; विद्यार्थ्यांना मिळेल असा फायदा

या टॅबच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. नवोदय, एनएमएमएस यासारख्या परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी या टॅब उपयुक्त ठरतील.

जिल्हा परिषदेतील मुलं हायटेक, तंत्रज्ञानाचा वापर; विद्यार्थ्यांना मिळेल असा फायदा
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 2:26 PM

गोंदिया : सद्या दफ्तराचे ओझे वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तका व्यतिरिक्त नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होणे आवश्यक आहे. याकरिता गोंदिया जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील नामांकित शाळेमधील शिक्षकांना टॅब मोबाईलचे वाटप केले आहे. शाळेतील जे शिक्षक तंत्रस्नेही आहेत, त्यांना हे मोबाईल पुरवठा करण्यात आले आहे. जेणेकरून या टॅब मोबाईलद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणं सोप होईल. तसेच यूट्यूब, दिशा ॲप, यांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना काही नवीन शिक्षणं देतील. विद्यार्थ्याना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती होईल. इतकेच नाही तर स्पर्धा परीक्षा, नवोदय विद्यालय परीक्षा संदर्भातील माहिती विद्यार्थ्याना सहज उपलब्ध होईल. या टॅबच्या सहायाने शिक्षकांनासुध्दा कुठलीही गोष्ट सहज शिकवणं सोप होणारं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा आणखी सुधारेल हीच अपेक्षा आहे.

१६ शाळांमध्ये ८७ टॅबलेट

गोंदियाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये म्हणाले, जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार १३९ शाळा आहेत. सध्या १६ शाळांमध्ये ८७ शिक्षकांसाठी टॅबलेट पुरवण्यात आले आहेत. जग डिजिटल युगाकडे वळत आहे. जिल्हा परिषद शाळांना डिजीटल शाळांच्या माध्यमातून चालना मिळावी. त्यांना चांगले शिक्षण मिळावे, असे शिक्षण विभागाचे प्रयत्न आहेत.

उपक्रमशील शाळा, चांगली पटसंख्या असलेल्या शाळा तसेच तंत्रस्नेही शिक्षक असलेल्या शाळांना हे टॅब मोबाईल दिले गेले आहेत. या माध्यमातून यु ट्यूबवरील शैक्षणिक साहित्य पाहता येईल. ई पाठशाला सारख्या अॅपच्या माध्यमातूनही विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊ शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Gondia 2 n

नवोदय, एनएमएमएस यासारख्या परीक्षांसाठी उपयुक्त

तंत्रस्नेही शिक्षक अजय तितिरमारे म्हणाले, जिल्हा परिषदेकडून आमच्या शाळेला सहा टॅब मिळाले आहेत. या टॅबच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. नवोदय, एनएमएमएस यासारख्या परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी या टॅब उपयुक्त ठरतील. शासनानं सध्या सहा टॅब आम्हाला दिल्या आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना या टॅबचा फायदा होईल.

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये टॅबचा पुरवठा करण्यात आला आहे. हे सर्व टॅब जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना आणि शाळांना पुरविण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण घेता येणार आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.