पळसाला पानं तीन, तशीचं फुलंही तीन रंगांचे; येथे दिसतील तुम्हाला तिन्ही रंगांची फुलं
तिरोडा येथे पिवळ्या रंगाची फुलं आहे. सालेकसा येथे पांढऱ्या रंगाची फुल आहे. ही फुल पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
गोंदिया : होळी म्हटलं की लाकडाची होळी डोळ्यासमोर येते. त्यानंतर येथे ती रंगपंचमी. रंगपंचमीला रंगांची उधळण केली जाते. निसर्गातही रंगांची उधळण केले गेली आहे. वसंत ऋतू लागताच पळसाला फुलं येतात. लाल रंगांची फुलं बहुतेक ठिकाणी दिसतात. पण, याशिवाय पिवळे आणि पांढरे फुलंदेखील पूर्व विदर्भात दिसतात. तिरोडा पिवळ्या रंगाची फुलं आहे. सालेकसा येथे पांढऱ्या रंगाची फुल आहे. ही फुल पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. पिवळ्या पळसाला फुल यायला सुरवात झाली आहे. मात्र पिवळ्या आणि पांढरा रंगाचा पळस फुलं ही क्वचितच पाहायला मिळतात.
दुर्मिळ वृक्ष संवर्धानाचा संदेश
पळसाला पाने तीन ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. मात्र याच पळसाला तीन रंगाचे फुल देखील येतात. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात विविध प्रजातीची दुर्मिळ वृक्ष आहेत. याच वृक्षांवर लाखो पशु पक्ष्याचा अधिवास असतो. दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन व्हावे आणि याची माहिती भावी पिढीला देखील व्हावे हे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून गोंदियाचे तत्कालीन जिलाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दुर्मिळ प्रजातीच्या वृक्ष संगोपनाचा संदेश दिला.
फुलातील अर्क शोषून घेतात
दुर्मिळ वृक्षाचा शोध घेत गोंदिया जिल्ह्यातदेखील पिवळा आणि पांढरा पळस आहे, हे शोधून काढले. आज पिवळ्या पळसाची फुले आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली. होळीच्या सणात या फुलापासून तयार होणाऱ्या रंगाला आणि गुलालाला होळी निमित्त मोठी मागणी असते. आज या पिवळ्या आणि संत्री पळसाच्या फुलांचा आनंद घेण्यासाठी मनुष्यच नाही तर पशुपक्षी देखील या झाडांवर आपल्या चोचीने पुलातील अर्क ओढून आपले पोट भरतात. याच वाळलेल्या फुलांपासून बचत गटातील महिला होळीनिमित्त सेंद्रिय रंग तयार करतात. या रंगांना बाजारात देखील मोठी मागणी आहे. नैसर्गिक रंग हे पळसाच्या फुलांपासून तयार होतात. काही बचतगट नैसर्गिक रंग तयार करतात. त्यांची विक्रीही करतात. त्यातून रोजगार निर्मिती होते.