गोंदिया : शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्षासाठी ज्यादिवसापासून न्यायालयीन लढा सुरू झाला आहे. त्यादिवसापासून ठाकरे गट आणि शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे गट, भाजप या पक्षामधून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. तसेच राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेसह राणे पितापुत्रांकडूनही ठाकरे गटावर टीका केली जात आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि राणे हा वाद विकोपाला गेला आहे.
राणे पितापुत्रांकडून वारंवार उद्धव ठाकर आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून अरविंद सावंत यांनी त्यावरून निलेश राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यापेक्षा निलेश राणे यांनी आधी स्वतःचं पाहावं असा सल्ला त्यांनी निलेश राणे यांना दिला आहे. त्यामुळे हा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर ज्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. त्यांनी आधी आपले स्थान काय आहे तेही पाहावे असा टोला अरविंद सावंत यांनी शिवसेनेतील नेत्यांना लगावला होता.
ठाकरे गटावर भाजपचे राम कदम, आणि शिंदे गटातील नेते टीका करत असतात. मात्र जे नेते टीका करतात ती लोकं भुरटी आहेत आणि बिकाऊ औलादीची आहे असा जोरदार हल्लाबोल त्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर केला होता.
भाजपच्या निलेश राणे यांनी ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी आधी आपल्या स्वतःच स्थान काय त्याकडे पाहावे असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
निलेश राणे यांच्याकडून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची बाजू ते घेत असले तरी विधानसभेत त्यांच्या सगळ्या फाईल्स या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवल्या होत्या. ती गोष्ट निलेश राणे यांनी लक्षात ठेवावी असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
शिवसेनेचे नेते अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून भाजपचे राम शिंदे यांच्या पर्यंत सगळे नेते उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर टीका करत असतात.
मात्र जी लोकं ठाकरे गटावर टीका करत आहेत. त्यामध्ये राम कदम आणि शिंदे गटातील अनेक नेते आहेत. मात्र ही सगळी लोकं भुरटी आणि बिकाऊ औलादीची आहेत अशी जहरी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.