Gondia | अरुणाचल प्रदेशातील हिमवृष्टीत जवानाचा मृत्यू, जवानाचे पार्थिव चिरेखणी गावात पोहचले
गोंदियातील जवानाचा अरुणाचलमधील हिमवृष्टीत मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शरीर आज तिरोडा तालुक्यातील चिरेखणी येते दाखल झाले. चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. जवान गेल्यानं त्यांच्या कुटुंबीयांवर फार मोठा आघात पोहचला आहे.
गोंदिया : जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील चिरेखणी (Chirekhani in Tiroda taluka) येथील मराठा रेजीमेंटमध्ये (Maratha Regiment) महेंद्र भाष्कर पारधी (Mahendra Bhaskar Pardhi) हा जवान कार्यरत होता. अरुणाचल येथे होत असलेल्या हिमवृष्टीमुळे महेंद्र याचा बर्फाच्या ढिगाऱ्यात दबून मंगळवारी रात्री मृत्यू झाला. महेंद्र यांचे पार्थिव शरीर आज त्याच्या स्वगावी चिरेखणी येथे पोहचले. लष्करी इतमामात अंत्यसंस्कार चार वाजता होणार आहे. महेंद्र यांच पार्थीव शरीर स्वगावी पोहचताच नागरिक तसेच शाळकरी मुलांनी सुद्धा सलामी दिली. महेंद्र यांच्या वडिलांचा मृत्यू आधीच झाला. जीवंत आईला जवान मुलाचे पार्थीवच पाहायला मिळाले. महेंद्र यांच्या पत्नीचे नाव गायत्री आहे. त्यांना दोन मुले आहेत. महेंद्र यांनी तीन भाऊ आहेत.
चिरेखणीचा जवान गेला
महेंद्र पारधी हा 37 वर्षांचा जवान दिब्रुगड भागात कार्यरत होता. मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान हिमवृष्टी झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. महेंद्र यांचा जन्म 1985 मध्ये झाला. सुरुवातीचे शिक्षण चिरखणी व त्यानंतर तिरोडा येथे झाले. जवान ज्या ठिकाणी कार्यरत होता त्याठिकाणी 24 वर्षे सेवा द्यावी लागते. सेवानिवृत्तीला आठ वर्षे बाकी होते. एकूण 16 वर्षे सेवा दिली होती.
अशी घडली घटना
महेंद्र पारधी सहा जवानांसह गस्तीवर होते. जोरात हिमवृष्टी झाली. रस्त्यांवर काही दिसत नव्हते. त्यांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. तुफान आणि ढगाळी वातावरणात हे जवान अडकले होते. त्यात महेंद्र यांचा हिमवृष्टीत मृत्यू झाला. माजी आमदार दिलीप बंसोड, जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, यांनी महेंद्र यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आज सायंकाळी चार वाजता शासकीय इतमामात महेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.