Gondia | गोंदियात बालकामगार ठेवाल तर तुरुंगात जाल! कामगार कार्यालयाकडून शोधमोहीम; कारवाईचा इशारा
बाल कामगारांना कामावर ठेवणे कायद्यानुसार गुन्हा आहे. गोंदिया जिल्ह्यातील किती बाल कामगार कामावर आहेत. त्याचा शोध आता बाल कामगार विभागाच्या वतीने घेतला जात आहे. त्यामुळे तुमच्याकडे बाल कामगार आढळल्यास तुम्हाच्या वर कारवाई निच्छित समजा.
गोंदिया : 18 वर्षे वयाखालील मुला-मुलींना कामावर ठेवणे अवैध आहे. काम करणाऱ्या अशा मुला-मुलींना बालकामगार म्हटले जाते. अशा या बालकामगारांचा कामगार कार्यालयाकडून नियमित शोध घेतला जातो. त्यानुसार कार्यालयाच्या वतीने नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सुदैवाने या मोहीम पथकालाही गोंदिया पथकाला (Gondia Squad) बालकामगार आढळून आला नाही. बालकामगार (Child Labor) कामावर ठेवू नये, असा नियम असला तरीही कित्येक जण नियमांना मोडून आपले काम काढून घेण्यासाठी त्यांना कामावर ठेवतात. खेळण्या- बागडण्याच्या व शिक्षण घेण्याच्या वयात लहान मुला-मुलीने मजबुरीने धुणी-भांडी, हॉटेलात किंवा कारखान्यात काम करावे लागते. अशात बालकामगारांना या पाशातून मुक्त करण्यासाठी कामगार कार्यालयाकडून (Labor Office) बाल व किशोरवयीन मुला मुलींची शोधमोहीम सुरू केली आहे.
पालकांना रोजगार मिळावा
बाल कामगारांना कामावर ठेवणे कायद्यानुसार गुन्हा आहे. गोंदिया जिल्ह्यातील किती बाल कामगार कामावर आहेत. त्याचा शोध आता बाल कामगार विभागाच्या वतीने घेतला जात आहे. त्यामुळे तुमच्याकडे बाल कामगार आढळल्यास तुम्हाच्या वर कारवाई निच्छित समजा. कामावर बालकामगार आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. गोंदियातील सहकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे यांनी सांगितलं. तर दुसरीकडं पालकांना शासनाने रोजगार उपलब्ध करून दिला तर बालकामगार घडणार नसल्याचे सामाजिक कार्यकर्ती सविता बेदरकर यांनी सांगितलं.
येथे दिसतात बालकामगार
गोंदिया जिल्ह्यात वीटभट्टीचं काम केलं जातं. त्याठिकाणी कामावर बालकामगार सापडण्याची शक्यता आहे. शिवाय काही हॉटेल्समध्ये लहान मुलांकडून काम करून घेतलं जातं. तेंदुपत्ता तोडणीसाठीही बालकांचा वापर केला जातो. घरी खाण्याचे वांदे असले म्हणचे अशाप्रकरची नामुष्की ओढवते. त्यामुळं प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे. तर ते आपल्या कुटुंबाचं पालनपोषण योग्य पद्धतीनं करू शकतील, असंही सामाजिक कार्यकर्ती सविता बेदरकर यांनी सांगितलं.