Gondia Teak Smuggling : गोंदियात ट्रॅक्टरने सुरू होती सागवानाची अवैध तस्करी, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर फर्निचर मार्ट मालकाचा जीवघेणा हल्ला

वाहतूक परवाना न दाखवता त्याने मालकाला बोलावले. त्याच्या मालकाने रागा रागात वनपरिक्षेत्राधिकारी बागडे यांच्या अंगावर बाईक चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Gondia Teak Smuggling : गोंदियात ट्रॅक्टरने सुरू होती सागवानाची अवैध तस्करी, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर फर्निचर मार्ट मालकाचा जीवघेणा हल्ला
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर फर्निचर मार्ट मालकाचा जीवघेणा हल्ला
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 10:53 PM

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाकडाची चोरी होते. यावर आळा घालण्यासाठी वनअधिकारी नेमले जातात. तरीही हा प्रकार सुरू आहे. सागवानसारखे लाकूड विनापरवाना नेता येत नाही. पण, सालेकसा येथे हे सर्रास सुरू होते. या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी हे गस्तीवर होते. त्यांना सागवाननं भरलेला ट्रॅक्टर दिसला. त्यांनी चालकाला विचारना केली. चालकानं सरळ विनोद फर्निचर मार्टच्या (Vinod Furniture Mart) मालकास सांगितलं. मालकासोबत (Owner) अधिकाऱ्यांची बाचाबाची झाली. मालकाने बागडे यांच्या अंगावर बाईक चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न ( Attack) केला. या हल्ल्यात बागडे हे जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर सागवानासह जप्त करण्यात आला आहे. सागवान चोरांची मजल कुठपर्यंत जाऊ शकते, हे या घटनेतून दिसून येते.

वनपरिक्षेत्राधिकारी जखमी

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील विनोद फर्निचर मार्टसमोर रोडवर सागवान लाकडाने भरलेला ट्रॅक्टर उभा होता. विना नंबर ट्रॅक्टर पाहून गस्तीवर असलेले विभागीय व्यवस्थापक नितीशकुमार आणि वनपरिक्षेत्राधिकारी मंगेश बागडे यांनी ट्रॅक्टर चालकाला विचारना केली. सागवानाचा वाहतूक परवाना (टीपी) विचारला. वाहतूक परवाना न दाखवता त्याने मालकाला बोलावले. त्याच्या मालकाने रागा रागात वनपरिक्षेत्राधिकारी बागडे यांच्या अंगावर बाईक चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वनपरिक्षेत्राधिकारी गंभीर जखमी झाले.

ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा

तसेच उपस्थित अधिकाऱ्यावर शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सागवान भरलेला ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. फर्निचर मार्टचे मालक विनोद जैन यांच्यासह दिनेश कटरे विरुध्द् गुन्हा दाखल केला. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर 353 , 332, 504, 506 अश्या विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सलेकसा पोलीस करीत आहेत. अशी माहिती सालेकसाचे पोलीस निरीक्षक जे. पी. हेगडकर यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.