गोंदिया : संपूर्ण महाराष्ट्रात वीज बिलाचा प्रश्न आपण नेहमीच बघतो. मात्र गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी (Tribal) नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या सालेकसा (Saleksa) तालुक्यातील खोलगड या गावात शेतकऱ्यांना मीटर रिडिंगनुसार वीज बिल पाठविलं नाही. भरमसाठ वीज बिल पाठविल्याने एवढा मोठा वीज बिल भरावा कसा ? असा प्रश्न शेतकऱ्यांना करावा लागत आहे. आधीच पिकातून हाती काही न लागल्याने विज बिलासाठी जीव द्यायचा काय असा सवाल शेतकरी विचारताय. अतिदुर्गम आदिवासी नक्षलग्रस्त (Naxalite) भागातील शेतकऱ्यांना 10 ते 40 हजार रुपयांपर्यंत वीज बिल पाठविण्यात आलं. अवाढव्य वीज बिल भरायचा कसा शेतकऱ्याना पडला प्रश्न पडला आहे. मागील मीटर रिडिंगनुसार वीज बिल पाठवले. यामुळं महावितरणाचा भोंगळ कारभार समोर आलाय. शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबाला आणि पाळीव प्राण्यांच्या सहित आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील वीज बिलाचा प्रश्न आपण नेहमीच ऐकतो. मात्र खोलगड येथील शेतकऱ्याना 10 हजारांपासून 40 हजारांपर्यंत वीज बिल पाठविल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. वीज बिलाचा भरणा करण्यासाठी शेतकऱ्यांना हैराण केले जात आहे. भर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वीज बिल पाठविल्याने शेतकऱ्यांनी आज चक्क कार्यकारी अभियंता विद्युत विभागाचे कार्यालय गाठले. वारंवार पाठपुरावा करून देखील अनेक शेतकऱ्याचे वीज मीटर दुरुस्त किंवा रिडिंग दिसत नाही. या कारणावरून उन्हाळ्यात येणारे वीज बिलाचा आधार घेऊन महावितरण विभागाने ग्राहकांना पाठविल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गरीब शेतकरी अडचणीत आला आहे.
वीज बिलाच्याविषयी वारंवार पाठपुरावा करून देखील शेतकऱ्यांना त्रास देणे सुरू राहिला. खोलगड वासियांनी शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबाला आणि पाळीव प्राण्यांच्या सहित आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांनी आठ दिवसांत त्यांच्या वीज बिलाच्या समस्येचे निराकरण करा. अन्यथा आंदोलनाच्या इशारा दिला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महावितरण विभाग कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चांदेवर, त्रस्त महिला शेतकरी पुष्पाकला मोहरे, संतोष रहांगडाले शेतकरी आणि पीडित शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.