Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार कुटुंबियांच्या दिवाळी पाडव्यातील गोडवा हरवला; अजित पवार गटातील बडा नेत्यांनी दिली बोलकी प्रतिक्रिया

Diwali Padawa : यंदा बारामतीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबियांच्या आनंदाला दु:खाची किनार होती. यंदा बारामतीत पवार कुटुंबियात दोन पाडवे झाले. शरद पवार आणि अजित पवार अशी सीमा रेषा अधिक रूंद झाली. विरोधक आणि महायुतीमधून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्याने त्यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पवार कुटुंबियांच्या दिवाळी पाडव्यातील गोडवा हरवला; अजित पवार गटातील बडा नेत्यांनी दिली बोलकी प्रतिक्रिया
पाडव्याचा कटू अनुभव
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 3:22 PM

यंदा बारामतीमध्ये दिवाळी पाडव्याचे वेगळं चित्र दिसले. दिवाळी पाडव्याला पवार कुटुंबियांची दुःखाची झालर ठळकपणे दिसली. पक्ष फुटल्यानंतर घरात फुट नसल्याचे वरवर दिसत असले तरी यंदा बारामतीत पवार कुटुंबियात दोन पाडवे झाले. शरद पवार आणि अजित पवार अशी सीमा रेषा अधिक रूंद झाली. विरोधक आणि महायुतीमधून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्याने त्यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया काय

पवार कुटुंबीयांचे दोन ठिकाणी दिवाळी पाडवे होत आहेत. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता, पवार कुटुंबांचे जे काही आंतरिक विषय आहेत. त्याच्यामध्ये मी भाष्य करू इच्छित नाही. गेल्या 40-50 वर्षांपासून पवार कुटुंबियांसोबत माझे जवळचे संबंध राहिलेले आहेत. हे संबंध आजही आहेत आणि कायम राहतील. पण त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही आंतरिक विषय झाले असतील, त्यात मला बोलणं योग्य वाटत नाही असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीवर टीका

आम्हीही कालपर्यंत काँग्रेसमध्ये होतो, राष्ट्रवादीमध्ये होतो काँग्रेस सोबत काम केले आणि अनेक वेळा असं दिसत होतं की बोलणे आणि करणी मध्ये फरक दिसत होता. या वेळेस आमच्या महाराष्ट्र सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यामध्ये या योजनाचे आमच्या महाराष्ट्राचा एवढा मोठा बजट आहे. तरी सुद्धा आम्हाला ते देता येते कारण अजितदादा सारखे अनुभवी अर्थसंकल्प मंत्री आहेत, त्यामुळे शक्य आहे.

तर काँग्रेसच्या काळामध्ये अनेक काम जे होऊ शकले असते ते काम का नाही झाले, आज आमची लाडकी बहीण योजना व शेतकर्‍यांचे वि‍जेचे बिल माफ करण्याची योजना आम्ही सुरू केले आणि ती अंमलात सुद्धा आणली. मात्र त्याच्यावर विरोधी टीका का करतात तर जेव्हा त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनी ह्या योजना द्यायच्या होता व तुम्ही का दिलं नाही, दुसर्‍यांनी दिलं तर विरोध करत आहेत. आज महाराष्ट्र राज्य सक्षम राज्य आहे आणि महाराष्ट्र ने जे काही योजना दिली आहे. त्या साठी महाराष्ट्र सरकारने पुढचे पाच वर्ष ही योजना सुरू ठेवणार व त्यामध्ये वाढ सुद्धा कशी करता येईल आम्ही विचार करणार त्याच प्रमाणे धान पिकाला मागच्या वर्षी 20 हजार रुपये बोनस दिला होता, तर तो बोनस वाढून 25 हजार रुपये करणार आम्ही जे बोलतो ते करतो असे प्रफुल पटेल म्हणाले.

विरोधकांनी फेक नरेटिव्ह पसरवल

लोकसभेमध्ये तर नक्कीच फेक नरेटिव्ह होता. संविधान बदलणार त्या एका मुद्द्यावर इतका मोठं परिणाम झाला. लोकांना खरंच वाटलं 400 पारचा नारा दिल्यामुळे त्यावेळी ते घडले. पण या इलेक्शन मध्ये पहिले तर संविधानाच्या विषयी येतच नाही दुसरं या सहा महिन्यांमध्ये सगळ्यांना समजून आलं की हे फेक नरेटिव्ह होते.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.