“अजित पवार जेव्हा राज्य करतात, तेव्हा राज्य बुडवितात”; भाजपच्या मंत्र्याने अजितदादांवर साधला निशाणा
ज्यांच्याकडे दोन हजारच्या नोटा असतील त्या 30 सप्टेंबरपर्यंत आपण जमा करू शकतो पण ज्यांच्याकडे अवैध मार्गाने जमा करून ठेवलेले करोडो रुपये आहेत.

गोंदिया : रिझर्व्ह बँकेने 2 हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. 2 हजारच्या नोटाबंदीमुळे विरोधकांकडून टीका करण्यात आली तशीच त्या नोटा आता बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावरूनच भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार करत त्यांनी अजित पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना आणि नोटा बंदीचे समर्थन करत त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,रिझर्व्ह बँक अभ्यास करूनच नोटबंदीचा निर्णय घेत असते.
रिझर्व्हे बँकेच्या अशा या निर्णयामुळेच भारताची अर्थव्यवस्था सध्या सुदृढ आहे. 2000 च्या नोटा सध्या चलनात कुठे आहेत आणि कुणाकडे आहेत हे यावरून सिद्ध होत असते. यावेळी त्यांनी यावरून अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
सुधीर मुनगंटीवार अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की,अजित पवार जेव्हा राज्य करतात तेव्हा राज्य बुडवितात असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे. 2 हजारच्या नोटा बंदीची मागणी काँग्रेस खासदारांनीच केली होती असा पलटवारही त्यांनी केला आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी नोट बंदीचे समर्थन करताना सांगितले की, रिझर्व्ह बँक भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करूनच असा निर्णय घेत असते.
आज देशाची अर्थव्यवस्था ही पाश्चातच्या देशांच्या अर्थव्यवस्थेबरोबर येत चालली आहे. तसेच भारताची आर्थिक प्रगती ही आता प्रगतशील देशाबरोबरच सुरु आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. विदेशातसुद्धा काही दिवसानंतर चलन बदलले जातात.
नोटबंदीवरून विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार लोकसभेमध्ये मागणी करतात की 2000 च्या नोटा बंद करावी.
तर दुसरीकडे म्हणतात या नोटा बाजारामध्ये दिसत नाही. म्हणजेच ज्या नोटा दिसत नाही, चलनामध्ये नाही, ज्या चलनातील अशा नोटा रिझर्व्ह बँक बंद करत असेल तर त्यामध्ये काय नवीन असा जेव्हा अजित पवार राज्य करतात तेव्हा राज्य बुडवितात असा टोला देखील लगावला.
या चलनात नाहीत तर मग कुठे आहेत याचा शोध घेणे आवश्यक आहे, उलट पत्रकारांनाच प्रश्न करीत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की तुमच्याकडे आहेत का 2000 च्या नोटा असतील तर मी पाचशे रुपये तुम्हाला बक्षीस देतो असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच या नोटान सामान्य लोकांकडे नाही मग कुणाकडे आहेत. ज्या लोकांनी बेइमानी करून संपत्ती जमवली असेल अशा लोकांकडे 2000 च्या नोटा आहेत का असा सवालही त्यांनी यावेळी केली आहे.
ज्यांच्याकडे दोन हजारच्या नोटा असतील त्या 30 सप्टेंबरपर्यंत आपण जमा करू शकतो पण ज्यांच्याकडे अवैध मार्गाने जमा करून ठेवलेले करोडो रुपये आहेत.
त्यांनी 2 हजारच्या वर पैसे जमा करायचे असल्यास पुरावे द्यावे लागणार यामुळेच विरोधकांच्या मनात धडकी भरली असल्याचा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी गोंदियात पत्रकारांशी बोलताना लगवला आहे.