Gondia Accident : गोंदियात दोन अनियंत्रित दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, अपघातात एकचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी

दोन दुचाकींवरुन चौघे जण मोरगाव अर्जुनी तालुक्यातील मुंगली गावातून विरुद्ध दिशेने चालले होते. मात्र दोन्ही बाईक सुसाट वेगात असल्याने दोन्ही बाईक अनियंत्रित झाल्या आणि एकमेकांवर येऊन धडकल्या. ही धडक एवढी भीषण होती की यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

Gondia Accident : गोंदियात दोन अनियंत्रित दुचाकीची समोरासमोर भीषण धडक, अपघातात एकचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 5:11 PM

गोंदिया : दारुच्या नशेत दुचाकी चालविणे दोन दुचाकीस्वारांना चांगलेच महागात पडले आहे. दोन अनियंत्रित दुचाकींमध्ये समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू (Death) तर तीन जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या मोरगांव अर्जुनी तालुक्यातील मुंगली गावात घडली आहे. नक्षीकांत वाघाडे (50) असे मयत व्यक्तीचे नाव असून तो भिवखिडकी येथील रहिवासी आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. (One killed, three injured in two bike accidents in Gondia)

चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात

दोन दुचाकींवरुन चौघे जण मोरगाव अर्जुनी तालुक्यातील मुंगली गावातून विरुद्ध दिशेने चालले होते. मात्र दोन्ही बाईक सुसाट वेगात असल्याने दोन्ही बाईक अनियंत्रित झाल्या आणि एकमेकांवर येऊन धडकल्या. ही धडक एवढी भीषण होती की यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मयत वाघाडे यांचा सहकारी आणि दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जण गंभीर झाले आहेत. जखमींना गोंदिया येथील रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन वर्षानंतर काल रंगपंचमी साजरी झाल्याने अनेकांचा उस्ताह गगनात मावेनासा झाला होता. त्यात नशापान करणे चौघांना चांगलेच महागात पडल्याचे दिसून आले आहे.

धुळ्यात ओव्हरटेकच्या नादात लक्झरी बसची वृद्धाला धडक

धुळ्यात पुढील वाहनाला ओव्हरेटक करण्याच्या नादात लक्झरी बसने रस्त्याशेजारी लावलेल्या फलकासह एका वृद्ध व्यक्तीला उडविल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. या घटनेत वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहादाकडून शिरपूरच्या दिशेने निघालेल्या लक्झरी बसने समोर चालणाऱ्या डम्परला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशादर्शक फलकाला ठोकले. यावेळी फलकाशेजारी उभे असलेले वृद्ध व्यक्तीलाही धडक बसली. (One killed, three injured in two bike accidents in Gondia)

इतर बातम्या

VIDEO : दारुच्या नशेत भान हरपलं अन् चाकू घेऊन नाचणं जीवावर बेतलं, मध्य प्रदेशातील धक्कादायक घटना

Video : ओव्हरटेकच्या नादात लक्झरी बसची फलकासह आजोबांना धडक, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.