या जिल्ह्यात 3207 डुप्लिकेट रेशन सापडली, पुरवठा विभागाच्या टोकाच्या निर्णयामुळं…

Maharashtra News : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात डुप्लिकेट रेशन कार्डचा प्रकार अनेकदा उजेडात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात 3207 बनावट रेशनकार्ड सापडल्यानंतर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

या जिल्ह्यात 3207 डुप्लिकेट रेशन सापडली, पुरवठा विभागाच्या टोकाच्या निर्णयामुळं...
fake ration cardImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 8:41 AM

गोंदिया : महाराष्ट्रात (Maharashtra) अनेक जिल्ह्यात बनावट शिधापत्रिका (duplicate ration card)असल्याचं अनेकदा उजेडात आलं आहे. ज्यावेळी असा प्रकार उजेडात आला आहे. त्यावेळी ती शिधापत्रिका अधिकाऱ्यांनी तात्काळ रद्द केली आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीला शिक्षा सुध्दा देण्यात आली आहे. सध्या हा प्रकार महाराष्ट्रात (Gondia)अधिक वाढला असल्यामुळे, पुरवठा विभागाने रेशनकार्डची कसून चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे लोकांना जे काही रेशन मिळत, ते रेशन डब्बल मिळावं यासाठी बनावट रेशन कार्ड तयार करण्यात आले होते. काही लोकांनी सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी रेशनकार्ड तयार केलं आहे. एकाचं घरात अनेक रेशन कार्ड असल्याचं ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेमुळे उजेडात आलं आहे. ज्यावेळी 3207 बनावट रेशनकार्ड सापडले. त्यावेळी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावला.

गोंदिया जिल्ह्यात सध्या जी काही कारवाई झाली आहे, ती कारवाई पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. यापुढे सुध्दा अशा पद्धतीने गोंदिया जिल्ह्यात बनावट रेशनकार्ड सापडल्यानंतर सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या कारवाईमुळे बनावट रेशनकार्ड असलेल्या लोकं चांगलीचं घाबरली असल्याची चर्चा देखील सुरु आहे.

वन नेशन-वन रेशनमुळे बोगसपणा आला पुढे…..

गोंदिया जिल्ह्यात काही रेशन कार्डधारकांनी डुप्लिकेट रेशन कार्ड बनवले असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यामुळे विभागाने रेशन कार्डाची छाननी करून या शिधापत्रिका तपासल्या, त्यावेळी दोषी आढळणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली. दुसऱ्या राज्यातून हंगामी कामासाठी रोजगाराच्या शोधात आलेले नागरिक महाराष्ट्रातही रेशन कार्ड बनवितात अशी सुध्दा माहिती या प्रकरणामुळे उजेडात आली आहे.

हे सुद्धा वाचा

इतर राज्यातील लोकं त्यांच्या राज्यात आणि महाराष्ट्रात रेशनचा लाभ उचलत होते. केंद्र शासनाने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही योजना सुरू केली. या योजनेत लाभार्ती व्यक्ती कोणत्याही राज्यात असली, तरी त्या व्यक्तीला लाभ घेता येतो. त्यामुळे आता दोन रेशनकार्डची गरज उरलेली नाही. ज्या ठिकाणी दोन रेशनकार्डच्या माध्यमातून धान्याचा लाभ घेतला जात होता. त्यापैकी एक रेशनकार्ड रद्द केलं जातं आहे. यापुढे देखील ही प्रक्रिया अशीचं पुढे चालू राहणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांनी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 207 रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत
अनिल देशमुखांवर नागपुरात हल्ला, गाडीवर दगडफेक अन डोक्याला गंभीर दुखापत.