‘ज्यांना विधानसभेची जाणीव…,’ राज यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काय म्हणाले पटेल ?

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे  पवार यांच्यावर प्रफुल पटेल यांनी टीका केली होती. त्यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झालो असले तरी शरद पवार साहेबाबद्दल माझ्या मनात आजही आदर कायम आहे आणि मी त्यांना आपला गुरु मानतो,त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही असेही पटेल यांनी सांगितले.

'ज्यांना विधानसभेची जाणीव...,' राज यांच्या 'त्या' वक्तव्यावर काय म्हणाले पटेल ?
raj thackeray and praful patel
Follow us
| Updated on: Sep 29, 2024 | 3:42 PM

जरांगेंनी मागणी केलेल्या मराठा समाजाच्या सगे सोयऱ्याच्या आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे. परंतु त्याचबरोबर ओबीसी, इतर समाजांच्या आरक्षणावर त्याचा काय परिणाम होईल, याचा सुद्धा संपूर्ण अभ्यास सरकार करीत आहे. त्यामुळे मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यासंबंधी महाराष्ट्र सरकार काम करीत आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी गोंदिया येथे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसंवाद यात्रा’ ही पुढच्या आठवड्यात गोंदिया जिल्ह्याच्या दौरा करणार असून गोंदिया जिल्ह्याच्यासह वाशिम , बुलढाणा ,यवतमाळ या शहरांमध्ये सुद्धा ही यात्रा जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळालेले आहे आणि शरद पवार गटाला तूतारी चिन्ह देण्यात आलेला आहे, परंतु याबाबत आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आली आहे आणि याबाबत सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल असेही पटेल यांनी यावेळी सांगितले. रोहित पवार यांनी पाच वर्षे जनतेची सेवा केली आणि पुढील पाच वर्षात ते महाराष्ट्राची सेवा करतील, त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात येईल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. त्याबद्दल विचारले असता खासदार प्रफुल पटेल म्हणाले की प्रत्येक नेते हे त्या क्षेत्रात जाऊन आपला नेता निवडून यावा यासाठी अशा प्रकारची वक्तव्यं करीत असतात, परंतु यांची सत्ता येईल तेव्हाच ते मंत्री करतील ना असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

निवडणुका या दिवाळीनंतर घ्याव्यात …

सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या दिवाळीनंतर घेण्यात याव्यात अशी विनंती केली आहे, त्यावर बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की बरोबर आहे कारण महाराष्ट्रामध्ये लगेच आता नवरात्र,दिवाळी यासारखे मोठे सण आहेत आणि या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक हे व्यस्त असतात आणि त्यामुळेच निवडणुका ह्या दिवाळीनंतर घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज ठाकरे यांच्यावर टीका

राज ठाकरे यांनी लाडकी बहीण ही योजना राजकीय स्वार्थासाठी काढली असून या योजनेच्या बोज्यामुळे जानेवारी नंतर कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला देखील पैसे उरणार नाहीत अशी टीका मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केली आहे. त्यावर प्रफुल पटेल म्हणाले की ज्यांना विधानसभा आणि सरकारची जाणीव नाही, त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल काय बोलावे अशी टीका प्रफुल पटेल यांनी केली आहे.

मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला.
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?
उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार?.
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका
'रोहित पवारांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 % शेण...', मिटकरींची टीका.
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर..
जरांगे पाटील अमित शहांवर संतापले, मराठ्यांच्या नादी लागू नका नाहीतर...
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी
तर शाळांवर कडक कारवाई होणार, शिक्षण विभागाकडून मोठा शासन निर्णय जारी.
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका
सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाही? 'लाडकी बहीण'वरून राऊतांची टीका.