Gondia Road : आमगाव-देवरी महामार्गाची चाळण, जागोजागी पडलेत खड्डे, दोन वर्षांपासून बांधकाम सुरूच
देवरी तालुक्यात वडेगाव येथील महामार्ग बांधकाम अपूर्ण आहे. परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. काहींना आपला जीव सुद्धा गमावला आहे.

गोंदिया : देशात अनेक ठिकाणी सध्या मोठ्या संख्येने नवीन राष्ट्रीय महामार्गा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्याच धर्तीवर गोंदिया जिल्ह्यामधून राष्ट्रीय महामार्ग 543 चे काम गेल्या 3 वर्षापासून सुरू करण्यात आले आहे. आमगाव ते देवरी या महामार्गावर अनेक ठिकाणी जंगल व्याप्त परिसर येत आहे. अनेक ठिकाणी बांधकाम अपूर्ण आहे. याचा नाहक त्रास मात्र नागरिकांना (Citizens) करावा लागत आहे. या महामार्गावर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात आली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं प्रशासनासोबत (Administration) बांधकाम कंपनी ( Construction Company) कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या रस्त्याच्या बांधकामासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आलेत. पावसाळ्यात वाहतूक करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर अपघात होतात. खड्डांमुळं या रस्त्यानं प्रवास कसा करावा, असा प्रश्न प्रवाशांना पडलाय.
रस्त्याची दुरुस्तीच केली नाही
राष्ट्रीय महामार्ग 543 चे सध्या गोंदिया जिल्ह्यात जोमात काम सुरू आहे. मात्र गेल्या 3 वर्षापासून आमगाव ते देवरी महामार्गाचे काम सुरूच आहे. या महामार्गावर अनेक ठिकाणी वनविभागाची परवानगी आवश्यक असताना सुद्धा याकडं संबंधित कंपनीने दुर्लक्ष केलं. या भागात खोदकाम केले. मात्र आजही त्या रस्त्याची कोणत्याची प्रकारची दुरुस्ती केली नाही. या नादुरुस्त रस्त्यामुळं काहींना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. हा रस्ता दुरुस्त झाला नाही, तर आंदोलनाचा इशारा देवरीचे उपसभापती अनिल बिसेन यांनी दिलाय. गावकरीही त्यांच्यासोबत आंदोलन करण्यात तयार असल्याचं धनराज कुर्वे यांनी सांगितलं.

जागोजागी पडलेत खड्डे
रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
देवरी तालुक्यात वडेगाव येथील महामार्ग बांधकाम अपूर्ण आहे. परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. काहींना आपला जीव सुद्धा गमावला आहे. याकडं कुणीही लक्ष न दिल्याने आता मात्र गावातील नागरिकांच्या मनात या विरुद्ध आक्रोश निर्माण झालाय. आता रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही अनिल बिसेन यांनी दिला आहे. रस्ता बनवायचा नव्हता तर खोदकाम करण्याची गरज का ? असा सवाल राजकुमार रहांगडाले यांनी केलाय.


