Gondia Crime | गोंदियात रात्री अंगणात झोपले; चोरांनी मागून घर फोडले, डाव साधत दोन लाखांचा माल लंपास

अज्ञात चोरट्यांनी समोरच्या अंगणात कुटुंब झोपले असल्याचे बघीतले. मागच्या बाजूने प्रवेश करीत चोरट्याने घरात प्रवेश केला. धाब्यावरील दागिन्यांची पेटी घेऊन घराबाहेर पेटी उघडून दागिने व 30 हजार रोख रक्कम लंपास केले.

Gondia Crime | गोंदियात रात्री अंगणात झोपले; चोरांनी मागून घर फोडले, डाव साधत दोन लाखांचा माल लंपास
आमगाव तालुक्यातील करंजी येथील चोरीची घटनाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 12:36 PM

गोंदिया : जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील करंजी (Karanji) येथील ही चोरीची घटना आहे. लक्ष्मण मंगरू वाढई (Laxman Wadhai) व त्यांचे कुटुंब रात्रीला अंगणात झोपले होते. मागच्या दाराची कुंडी तोडून चोरांना घरात प्रवेश केला. धाब्यावर कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दरम्यान, साधारण अंदाजे दोन लाखांच्या घरफोडी प्रकरणी आमगाव पोलीस (Amgaon Police) स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजी हे गाव येते. लक्ष्मण मंगरू वाढई हे रात्रीला सहकुटुंब अंगणात झोपले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बाहेर झोपले होते. आज सकाळी उठले असता घरात चोरी झाल्याची लक्षात आले.

आमगाव पोलिसांत गुन्हा

अज्ञात चोरट्यांनी समोरच्या अंगणात कुटुंब झोपले असल्याचे बघीतले. मागच्या बाजूने प्रवेश करीत चोरट्याने घरात प्रवेश केला. धाब्यावरील दागिन्यांची पेटी घेऊन घराबाहेर पेटी उघडून दागिने व 30 हजार रोख रक्कम लंपास केले. दागिन्यांच्या पेटीतून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या दोन अंगठ्या, सोन्याची कानातील कर्णफुले इतर दागिने व रोकड असा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. आमगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास आमगाव पोलीस करीत आहेत.

आतून दरवाजा लावला

लक्ष्मण वाढई म्हणाले की, दोन नतन्या, गळ्यातला चोरीला गेले. आणखी काही दागिने चोरट्यांनी लंपास केले. घराच्या मागच्या भागातून ते घरावर चढले. कुटुंबीय घराच्या समोर झोपलो होतो. सकाळी पाच वाजता झोपेतून उठल्यानंतर ही बाब लक्षात आली. समोरचा दरवाजा चोरांनी आतून कुलूपबंद केला होता. मागच्या गल्लीतून येऊन बघीतलं. तेव्हा ही बाब लक्षात आली. दोन ते सव्वादोन लाख रुपयांचा माल चोरीला गेला असल्याचं वाढई यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.