शासकीय कर्मचाऱ्यांचा आठव्या दिवशीही संप सुरूच; सरकारी कामांना खीळ…
शासकीय कर्मचाऱ्यांचा आज संपाचा आठवा दिवस असून सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने सरकारी कार्यालयामध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
गोंदिया : सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी बेमुदत संप पुकारला होता. मात्र कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केल्यानंतर हा संप मागे घेत असल्याचे कर्मचारी संघटनेने जाहीर केले होते. हा निर्णय जाहीर होताच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संप मागे घेण्यावरून दोन गट पडल्याने काही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच गोंदिया जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चा आम्हाला मान्य नसून आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
त्यामुळे झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी अशी भूमिका घेतल्याने आता शासकीय कामांनाही खीळ बसली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नसल्याने सरकारी कार्यालयामधून शुकशुकाट पसरला आहे. अनेक नागरिकांची कामं जैसे थे राहिल्याने संपाचा फटका जनसामान्यांना बसला आहे.
जुनी पेन्शन योजनेसाठी संपूर्ण राज्यात सरकारी कर्मचारी संपावर होते, मात्र काल सुकाणू समिती सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.
मात्र गोंदिया जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुकाणू समितीचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी सुकाणू समितीचा निर्णय फेटाळला असून सर्व कर्मचारी संपावर कायम आहेत.
त्यामुळे आज पुन्हा जिल्हा अधिकारी कार्यलयासमोर सरकारी कर्मचारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांचा आज संपाचा आठवा दिवस असून सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने सरकारी कार्यालयामध्ये आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हा संप सुरुच राहणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये ज्या प्रमाणे फूट पडली आहे, तशीच फूट गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांमध्ये तर पडणार नाही असा सवालही उपस्थित केला जात आहे.