मृत व्यक्तीच्या नावाने टेंडर, जिल्हा परिषदेत घोटाळा; सीईओ यांनी केली तक्रार

मुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी पोलिसांत फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी पत्र काढले. पोलिसांना लागत असलेली संपूर्ण कागगपत्रेसुद्धा पोलिसांना पुरवले आहेत.

मृत व्यक्तीच्या नावाने टेंडर, जिल्हा परिषदेत घोटाळा; सीईओ यांनी केली तक्रार
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 8:31 AM

गोंदिया : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात मोठा घोटाळा झालाय. मृत व्यक्तीच्या नावाने टेंडर मंजूर करण्यात आले. बोगस स्वाक्षऱ्या करून तब्ब्ल 72 लाख रुपयांचे बिल काढण्यात आले. हा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात उघडकीस आला. गोंदिया जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. खोटी माहिती व मृत व्यक्तीच्या नावे टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. काम करत पैसे देखील उचल करणाऱ्या आरोपी विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर मुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी पोलिसांना पत्र देत संबंधित कागदपत्र पोलिसांना पुरवले आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाअंतर्गत 8 लाख रुपये किमतीच्या विद्युतीकरणाचे 8 कामे गोंदिया शहरातील बग्गा यांच्या फर्मला देण्यात आले. यातच भरनोली येथील उपकेंद्राकरिता 7 लाख 15 हजार रुपयांच्या कामाची निविदा गोंदियातील पी. ए. बग्गा कॉन्ट्रक्टर एण्ड सप्लायर यांनी सादर केली होती. ती निविदा 0.11 टक्के कमी दराने सादर केली होती.

टेंडरच्या वाटाघाटीसाठी मृत व्यक्ती कसा आला?

बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 4 मार्च 2022 ला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात बग्गा फर्मच्या संचालकांना वाटाघाटीसाठी बोलवण्यात आले होते. विशेष म्हणजे बग्गा फर्मचे संचालक प्रितपालसिंग अमोलकसिंग बग्गा यांचा मृत्यू 19 फेबुवारी 2021 ला झाल्याची नोंद घेण्यात आली. तरीही त्यांच्या नावावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात टेंडरची वाटाघाटी करण्यासाठी बोलविले असता मृत व्यक्ती कसा आला, असा प्रश्न उपस्थित होत होता.

फर्म संचालकाच्या मुलानेच केली फसवणूक

बग्गा फर्मचे संचालक प्रितपालसिंग अमोलकसिंग बग्गा हे मृत असताना त्यांच्या मुलाने स्वतः मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हजर राहून शासनाची फसवणूक केली. हे वर्क आर्डर स्वतः मिळवून घेतले होते. हे निष्पन्न झाले. आता मुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी पोलिसांत फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी पत्र काढले. पोलिसांना लागत असलेली संपूर्ण कागगपत्रेसुद्धा पोलिसांना पुरवले आहेत. पोलीस आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहेत. यामध्ये कोणकोण सहभागी आहेत, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.