ही माऊली परिवाराच्या पोटाचा आधार होती, कामावर जाताना ट्रॅक्टरवर पडून जीव गमावला

| Updated on: Feb 23, 2023 | 12:41 PM

ही माऊली परिवाराच्या पोटाचा आधार होती. कामावर जाताना ट्रॅक्टरवर पडून जीव गमावला. गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा येथील ही घटना आहे.

ही माऊली परिवाराच्या पोटाचा आधार होती, कामावर जाताना ट्रॅक्टरवर पडून जीव गमावला
Follow us on

गोंदिया : ग्रामीण भागात कामासाठी जाताना मजूर बहुधा ट्रॅक्टरचा वापर करतात. अशावेळी त्याठिकाणी त्या सुरक्षित राहत नाही. पण, कमी खर्चात प्रवास होता. यासाठी अशाप्रकारचा जीवघेणा प्रवास केला जातो. अशावेळी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशीच ही घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा-कारुटोला रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी आजूबाजूने मजूर जातात. त्यांना प्रवासासाठी ट्रॅक्टरवर बसवून नेले जाते. त्यात ट्रॅक्टरचा वापर गिट्टी, मुरुम टाकण्यासाठी केला जातो. या घटनेमुळे ट्रॅक्टरने प्रवास करणाऱ्या महिलांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. उद्या आपला अपघात झाल्यास कसं होणार, अशी भीती इतर महिलांना वाटू लागली आहे. पण, पोटापाण्यासाठी अशा जीवघेणा प्रवास सुरूच ठेवावा लागणार असल्याची भीती आहे. ही माऊली परिवाराच्या पोटाचा आधार होती. कामावर जाताना ट्रॅक्टरवर पडून जीव गमावला.

इंजीनवर बसून दहा मजूर करत होते प्रवास

रस्ता बांधकामाला जाणाऱ्या महिला मजूर ट्रॅक्टरवरुन पडली. यात डोक्याला मार लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्याच्या दवनीवाडा येथे घडली आहे. पुष्पा रमेश बागड़े (वय 40 वर्ष) असे मृतक महिलेचे नाव आहे. प्रधान मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत दवनीवाडा-कारुटोला रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. आज या बांधकामाला 10 मजूर ट्रॅक्टरच्या इंजीनवर बसून जात होते.

डोक्याला मार लागून जागीच मृत्यू

दवनीवाडा येथे भरधाव ट्रॅक्टरवरुन अचानक तोल गेल्याने पुष्पा सरळ डोक्याच्या भारावर रस्त्यावर पडली. त्यातच त्यांच्या डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच एकच गर्दी घटनास्थळी जमा झाली. तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्ती करत प्रकरण शांत केले आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक अपघाताला कारणीभूत

ग्रामीण भागात ट्रॅक्टरशिवाय ऑटोने प्रवास केला जातो. त्यातही खच्चून प्रवासी भरले जातात. अपघात होतात. जाणारा जातो. पुन्हा जैसे थे सुरूच राहते. अवैध प्रवास वाहतूक करणारे पोलिसांना सापडल्यास कधी कारवाई केली जाते तर कधी तोंडपाणी करून सोडून दिले जाते. त्यामुळे असे प्रकार घडत असतात. रस्ता बांधकामाचं काम करणारी माऊली ट्रॅक्टरवर प्रवास करत होती. पोटासाठीच्या संघर्षात जीव गमावला.