Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gondia News : स्वातंत्रदिनाच्या सु्ट्टीनिमित्त चार शिक्षक पिकनिकला गेले होते, मात्र एकच परतला, तिघांसोबत काय घडलं?

दोन दिवस सलग सुट्टी आल्याने चार मित्रांनी पिकनिकचा प्लान केला. त्यानुसार चौघे धरणावर पिकनिकला गेले. मात्र ही पिकनिक त्यांच्यासाठी अखेरची ठरली. पाण्यात पोहायला गेलेले तिघे पुन्हा बाहेर आलेच नाहीत.

Gondia News : स्वातंत्रदिनाच्या सु्ट्टीनिमित्त चार शिक्षक पिकनिकला गेले होते, मात्र एकच परतला, तिघांसोबत काय घडलं?
गोंदियात पिकनिकला गेलेले तीन शिक्षक धरणात बुडालेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 1:59 PM

गोंदिया / 16 ऑगस्ट 2023 : पिकनिकला गेलेल्या तीन मित्रांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना गोंदियात घडली आहे. तिघेही गोंदियातील एका खाजगी शिकवणी वर्गात शिक्षक पदावर कार्यरत होते. एन. मिश्रा, अरविंद सर आणि अतुल कडू अशी तिघा मयतांची नावे आहेत. स्वातंत्र्य दिन आणि पतेतीनिमित्त दोन दिवस सुट्टी असल्याने चौघे शिक्षक मित्र सहलीला गेले होते. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमधील एक छत्तीसगड, एक नागपूर आणि एक नागपूरचा रहिवासी आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने धरणाच्या बाहेर काढून राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

दोन दिवसाच्या सुट्टीनिमित्त सहलीला गेले होते चौघे मित्र

गोंदियातील सिद्धीविनायक एज्युकेशन इन्स्टिट्यूट या खाजगी शिकवणी वर्गात चार शिक्षक कार्यरत होते. दोन दिवस सुट्टी असल्याने चौघेही छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे मित्राच्या आमंत्रणावरुन पिकनिकला गेले होते. राजनांदगाव-सोमनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मांगता धरण येथे 15 ऑगस्ट रोजी सहलीसाठी गेले होते. धरणात पोहायला उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण बुडाले.

घटनेची माहिती मिळताच राजनांदगाव पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने तिघांचे मृतेदह पाण्यातून बाहेर काढले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजनांदगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित.
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल.
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कपात, 1500 नाही तर मिळणार फक्त 500 रुपये.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 2 मोठ्या घोषणा.
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.