Gondia Murder : गोंदियात तिहेरी हत्याकांड, एक जण गंभीर जखमी; एकाच दिवशी घडलेल्या घटनेमुळे जिल्हा हादरला

पहिल्या घटनेत खंडणीसाठी एका 17 वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील कारवाई करीत आहेत. दुसऱ्या घटनेत एकर्फी प्रेमातून एका तरुणाने एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या डोक्यावर लोखंडी हातोड्याने वार करुन तिची हत्या करण्यात आली.

Gondia Murder : गोंदियात तिहेरी हत्याकांड, एक जण गंभीर जखमी; एकाच दिवशी घडलेल्या घटनेमुळे जिल्हा हादरला
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 3:06 PM

गोंदिया : विविध कारणातून गोंदियात तिहेरी हत्या (Tripple Murder) झाल्याची घटना बुधवारी घडल्या आहेत. मृतांमध्ये एका तरुणाचा, एका अल्पवयीन मुलाचा आणि एका तरुणीचा समावेश आहे. तर एक तरुण जखमी (Injured) झाला आहे. एकाच दिवशी झालेल्या या हत्याकांडामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंभीर जखमी तरुणावर नागपुरात उपचार सुरु आहेत. आशिष ठाकूर असे जखमी तरुणाचे नाव आहे. (Triple murder in Gondia on the same day, one seriously injured)

पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

पहिल्या घटनेत खंडणीसाठी एका 17 वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिस पुढील कारवाई करीत आहेत. दुसऱ्या घटनेत एकर्फी प्रेमातून एका तरुणाने एका तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीच्या डोक्यावर लोखंडी हातोड्याने वार करुन तिची हत्या करण्यात आली. तर तिसऱ्या घटनेत रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बसंत नगर परिसरात रात्री उशिरा गोंदिया शहरात अज्ञात आरोपीने दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजा सांडेकर असे मयत तरुणाचे नाव आहे. हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी रामनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पुण्यातील खेडमध्ये जुन्या वादातून तरुणाची हत्या

जुन्या वादातून मित्रांनीच एका तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह घाटातील दरीत फेकल्याची धक्कादायक पुण्यातील खेडमध्ये घडली आहे. स्वप्नील सखाराम चौधरी (28) असे मयत तरुणाचे नाव आहे. स्वप्नीलच्या दोन मित्रांनीच खेड घाटात आधी त्याला दारु पाजली. त्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्याची हत्या केली. स्वप्नीलचा मृतदेह सापडल्यानंतर काही तासात पोलिसांनी हत्येचा उलगडा करीत आरोपींना अटक केली. (Triple murder in Gondia on the same day, one seriously injured)

इतर बातम्या

आईने बापाचा खून केला, पाच मुलं पोरकी, पोलिसातलं ‘मातृत्व’ जागं झालं, पाचही लेकरं दत्तक

Pimpri Chinchwad crime | जीवनसाथी डॉट कॉमवरून लग्नाचे आमिष दाखवत लोणावळ्यातील तरुणीला 14 लाखाला गंडवले

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.