कोण आहेत रत्नदीप दहीवले ज्यांनी गोंदियात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला?

| Updated on: Feb 25, 2023 | 4:15 PM

रत्नदीप दहीवले हे गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. एनएसयूआयमधून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.

कोण आहेत रत्नदीप दहीवले ज्यांनी गोंदियात काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला?
Follow us on

गोंदिया : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत गोंदियातील जिल्हा कार्याध्यक्ष रत्नदीप दहीवले (Ratnadeep Dahiwale) यांनी राजीनामा दिला. नाना पटोले यांच्या होमग्राऊंडवर हा राजीनामा दिला गेल्याने काँग्रेसमधील बंडखोरीला सुरुवात झाल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे नाना पटोले यांचे प्रदेश अध्यक्षपदी आणखी किती दिवस राहतात, हे पाहावं लागेल. कारण यापूर्वीही नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर विदर्भातील नेते आशिष देशमुख यांनी गंभीर आरोप केले होते. नाना पटोले यांची पक्षांतर्गत विरोधक वाढत असल्याचं दिसून येते. नाना पटोले यांच्यावर आरोप करून राजीनामा देणारे रत्नदीप दहीवले कोण आहेत. त्यांनी काय आरोप केलेत हे पाहुया.

हेतुपुरस्पर डावललं जातं

रत्नदीप दहीवले हे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. पण, ते आम्हाला काम करू देत नाही. बाहेरच्या लोकांना मुख्य पदावर बसवलं. काम करणाऱ्या लोकांना हेतुपुरस्पर डावललं जातंय. पद असून काम करू देत नाहीत, असा आरोप रत्नदीप दहीवले यांनी केला. सामान्य कार्यकर्ते कसे काम करणार असा सवाल त्यांनी विचारला. नाना पटोले यांच्या कार्यप्रणालीला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचं ते म्हणाले.

कोण आहेत रत्नदीप दहीवले

रत्नदीप दहीवले हे गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. एनएसयूआयमधून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. २००५ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. राज्यस्तरावर पक्ष संघटनेत काम केलंय. याची दखल घेत बाळासाहेब थोरात यांनी रत्नदीप दहीवले यांना कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती दिली.

पण, नाना पटोले प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून आम्हाला कायम विरोध केला. आम्ही त्यांच्याकडे गेलो. काँग्रेसचे जिल्ह्यात हाल सुरू आहेत. परंतु, त्यांनी याकडं लक्ष दिलं नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाचे नेते पक्षातून सोडून गेले. पक्ष वाढवायचा नसेल तर पक्षाला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळं या पदाचा मी राजीनामा देत आहे, असे रत्नदीप दहीवले यांनी स्पष्ट केलं.