विरोधी पक्ष महत्त्वाचा का असतो, सुषमा अंधारे यांनी उदाहरणं देऊन सांगितलं

केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयचा वापर केला जातो. स्थानिक ठिकाणी खोट्या केसेस लावल्या जातात.

विरोधी पक्ष महत्त्वाचा का असतो, सुषमा अंधारे यांनी उदाहरणं देऊन सांगितलं
सुषमा अंधारे
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 10:21 PM

गोंदिया – ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आज गोंदियात होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, १२० मुलांना क्रीडास्पर्धांमध्ये बाहेरगावी नेण्यासाठी श्वास कोंडला जातो. सत्ताधारी पांघरून टाकतात. विरोधकांचा स्वर दाबून टाकायचा असा प्रयत्न करतात. अशावेळी न्याय कसा मिळेल, असा सवाल त्यांनी विचारला. केंद्रात ईडी, सीबीआयचा वापर केला जातो. स्थानिक ठिकाणी खोट्या केसेस लावल्या जातात. पोलीस खोट्या केसेस दाखल करतात. कृषी आंदोलन सुरू होतं. तेव्हा सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी गेल्या. पोलिसांनी प्रियंका गांधी यांना व्हॅनमध्ये कोंबले. वाईट वर्तन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली नाही.

पण, जितेंद्र आव्हाड जेव्हा ताई सरकता का, असं म्हणतात. तेव्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो. प्रशासनात मी स्वतः काम केलंय. त्यामुळं त्यांचा नाईलाज असतो, असंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.

गोंदियातील एक उदाहारण देताना त्या म्हणाल्या, बलात्कार पीडित माऊली भरती होती. पोलीस आम्हाला तिला भेटूच देत नव्हते. योजनेअंतर्गतची मदत मिळावी. तिच्या उपचारासाठी मदत व्हावी. मदत द्यायची होती. पोलीस म्हणाले, नाही जायचं. नातेवाईकांना मदत देतो म्हणून सांगितलं तरीही पोलिसांनी भेटण्यास नकार दिला. पोलिसांची मुजोरी कशी ही पब्लिक डोमेनमध्ये असल्याचंही अंधारे म्हणाल्या.

आम्ही विनंती करतो. तरी ऐकत नाहीत. तुम्हा सांगा दादाहो मदत कशी करायची. सरकार म्हणते, आमची अडचण आहे. लेडी कान्स्टेबल आल्या. एकदा सांगितलेलं कळत नाही का. आपण कशाला शिरजोरपणा करावा. आम्हाला उपरसे आर्डर हैं.

एसपी साहेबांना भेटलो. वरिष्ठ अधिकारी संदीप पाटील होते. ते म्हणाले, नाही नाही ताई. मीही नाही काढले आर्डर. तरीही राऊत बाई म्हणतात, मुझे उपरसे आर्डर हैं. भाजपकडून येऊन हुकूम दाखविणारी ती महिला कोण, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. विरोधी पक्ष महत्त्वाचा का असतो, हे त्यांनी या उदाहरणातून स्पष्ट करून सांगितलं.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...