एकाच दिवशी कोव्हिशिल्डचे दोन डोस, महिलेचा आरोप, आरोग्य अधिकारी म्हणतात…

गोंदियात 62 वर्षीय महिलेनं एकाच दिवशी कोविशिल्डचे दोन डोस दिल्याचा आरोप केला आहे. Gondia Woman Covishield Vaccine

एकाच दिवशी कोव्हिशिल्डचे दोन डोस, महिलेचा आरोप, आरोग्य अधिकारी म्हणतात...
कोविशिल्डचा डोस घेतलेल्या भारतीयांचं ब्रिटनमधलं क्वारंटाईन बंद
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 11:29 AM

गोंदिया: भारतात सध्या कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. सध्या देशात कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी या लसींद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. गोंदियात 62 वर्षीय महिलेनं एकाच दिवशी कोविशिल्डचे दोन डोस दिल्याचा आरोप केला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस दहा मिनिटांच्या अंतरानं देण्यात आला, असं वृद्ध महिलेनं सांगितलं. मात्र. आरोग्य अधिकाऱ्यांनी महिलेनं दिलेली माहिती चुकीची असल्याचा खुलासा केला आहे. (Gonida woman Anusaya Paradhi claimed she got two dose of Covishield Vaccine at first time but District Health Officer denied claims)

नेमकं काय घडलं?

एकाच दिवशी कोरोनाच्या लसीचे दोन डोस दिल्याचा आरोप महिलेनं केला आहे.एकीकडे कोरोना रोखण्यात रामबाण समजले जाणारे कोविशील्डचा तुटवडा असताना एका 62 वर्षीय महिलेला पहिलाच डोस 10 मिनिटांच्या अंतराने दोनदा देण्यात आल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात येत असलेल्या गिधाडी येथील लसीकरण केंद्रावर घडल्याचा दावा करण्यात आल्यानं एकच खळबळ माजली आहे. महिलेनं केलेल्या आरोपाने प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. अनुसया केवलचंद पारधी (वय 62) असे त्या महिलेचे नाव असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कुठे प्रकार घडला?

गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील अनुसयाबा केवलचंद पारधी(वय 62) या ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य असून त्यांनी कोविशील्ड इंजेक्शनचा पहिला डोस घेण्याकरिता गावातीलच शाळेत पोहोचल्या. केंद्रावर उपस्थित आरोग्य सेविकेने त्यांना पहिला डोस दिला त्यांना काही वेळ तिथेच थांबण्यास सांगण्यात आले. मात्र, 10 मिनिटाने त्याच महिलेचे नाव घेऊन त्यांना पुन्हा बोलवण्यात आले. दुसरा डोस देखील देण्यात आला. महिलेने घरी जाऊन हा सर्व प्रकार मुलगा विनोद पारधी यांना सांगतिला. विनोद पारधी यानं दोन इंजेक्शन दिल्याचे घाव दिसून आल्याचा दावा केला आहे. सध्या त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे,

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं मत काय?

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे या प्रकरणाबाबत विचारणा केली असताना या महिलेचा दोनदा लस देण्यात आली नाही. आम्ही याची संपूर्ण माहिती घेतली असून ही अफवा आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे यांनी यांनी दिली आहे,य

संबंधित बातम्या:

Coronavirus: कोव्हॅक्सिन घेणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करण्यास मज्जाव?

स्टॉक नसतानाही लसीकरणास सुरुवात; ‘सीरम’ची केंद्र सरकारवर टीका

(Gonida woman Anusaya Paradhi claimed she got two dose of Covishield Vaccine at first time but District Health Officer denied claims)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.