एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी पगार होणार

यंदा दिवाळीचा सण तोंडावर आला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनसचा प्रश्न सुटलेला नाही. परंतू दिवाळीचा बोनस केव्हा मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत असताना दिवाळीच्या आधी सप्टेंबरचा पगार त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दिवाळीपूर्वी पगार होणार
Follow us
| Updated on: Oct 25, 2024 | 4:47 PM

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार यंदा दिवाळीच्या आधी त्यांच्या बॅंकच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला सप्टेंबर 2024 च्या सवलत मुल्यांच्या प्रतिपूर्ती पोटी 350 कोटी रुपये रोखीने प्रदान करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच सप्टेंबर महिन्याचा पगार त्यांचा खात्यावर जमा होणार आहे. एरव्ही एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या 7 ते 10 तारखांना त्यांच्या खात्यावर जमा होत असतो. परंतू यंदा विशेष बाब म्हणून दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पगार दिवाळीच्या आधीच एसटी कामगारांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने सप्टेंबर 2024 च्या महिन्यासाठी सवलतमूल्याची रक्कम म्हणून 350 कोटी रुपये देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. महामंडळाच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने सरकारने या विनंतीला मंजूरी दिली आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी 350 कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे. आणि दिवाळी पूर्वी ही रक्कम एसटी महामंडळास वितरित करण्याचे नियोजन केले आहे. या निधीमुळे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन दिवाळीच्या आधी मिळणे शक्य होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची बोनस मिळण्याची मागणी

28 ऑक्टोबर पासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत आहे. महानगर पालिका आणि अन्य कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळाला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील बोनस मिळावा अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 55 कोटींचा निधी तातडीने द्या, अशीही मागणी त्यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार की नाही हा प्रश्न अनुत्तरित असला तरी दिवाळी आधी त्यांचा पगार मात्र त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

Non Stop LIVE Update
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? काय म्हणाल्या अमृता फडणवीस?.
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'
कंठ दाटला, डोळे पाणावले...जरांगे झाले भावूक; म्हणाले, 'लढा थांबता...'.
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने
यंदा राष्ट्रवादी vs राष्ट्रवादी लढत, ‘या’ मतदारसंघात येणार आमने-सामने.
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा
'हम तो ऐसे बदनाम है की बदनामी...', गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा.