Coastal Road | मुंबईकरांसाठी खुशखबर, वाहतूक कोंडीतून होणार सुटका ! कोस्टल रोडचं आज उद्घाटन..

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. बीएमसी (मुंबई महानगरपालिका)च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचं (सागरी किनारा मार्ग) आज उद्घाटन होणार आहे. कोस्टल रोडची (दक्षिण) एक बाजू वाहतुकीसाठी खुली होणार आहे.

Coastal Road | मुंबईकरांसाठी खुशखबर, वाहतूक कोंडीतून होणार सुटका ! कोस्टल रोडचं आज उद्घाटन..
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 9:48 AM

मुंबई | 11 मार्च 2024 : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांची इतक्या वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. लवकरच मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. बीएमसी (मुंबई महानगरपालिका)च्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचं (सागरी किनारा मार्ग) आज उद्घाटन होणार आहे. कोस्टल रोडची (दक्षिण) एक बाजू वाहतुकीसाठी खुली होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उद्घाटन होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असून त्यामुळे वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या मुंबईकरांना थोडा दिलासा मिळणार आहे.

दक्षिण मुंबईतील परिसर हा व्यापार उदिमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. दक्षिण मुंबईला थेट ऊत्तर मुंबईशी जोडलं जाण्यात या रोडची महत्वाची भूमिका असणा असून मुंबईसाठी हा रस्ता गेम चेंजर ठरणार आहे. कोस्टल रोड प्रोजेक्ट हा पहिल्या टप्प्यात मरीन ड्राइव ते वरळीपर्यंत आहे, जो पुढे वरळी-बांद्रा सी लिंकहून कनेक्ट होईल. त्यामुळे 30 मिनिटांचं अंतर 10 मिनिटांत पार होईल. तप पुढे हा रस्ता वरळी ते बांद्रा आणि त्यापुढे दहीसरपर्यंत जाणार आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या ‘अटल सेतू’ नंतर आता सोमवारी कोस्टल रोडची एक बाजू वाहतुकीसाठी खुली असल्याने मुंबईकरांना दिलास मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे आज उद्घाटन होणार आहे. मागील आठवड्यातच मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडचा पाहणी दौरा करून आढावा घेतला.

अतिमहत्वाकांक्षी प्रकल्प

मुंबई महानगरपालिकेचा हा अतिमहत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे, याला 1600 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. समुद्राला दोन पावलं मागे सारून आणि समुद्राच्याच पोटातून भुयार खोदून हा रस्ता तयार केलाय. व्हेंटिलेशसाठी हायटेक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. सध्या या टनलमध्ये मोबाईल नेटवर्क नाहीये, पण भविष्यात त्याचीही व्यवस्था केली जाणार आहे, हा रस्ता म्हणजे इंजिनियरिंगचा एक अजूबाच म्हटला जात आहे. आचारसंहिता लागण्याआधी कोस्टल रोडचे आज उद्घाटन होणार आहे, त्यामुळे दक्षिण मुंबईतील मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचीही चर्चा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.