रूपाली चाकणकरांचा नवा उपक्रम, विद्यार्थिनींसाठी ‘खास’ बँक…
राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी "सॅनिटरी नॅपकिन बँक, आपल्या आरोग्यासाठी" हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
State Commission for women : राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी शालेय विद्यार्थिनींसाठी (Student) एक नवा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन दिले जाणार असून गुड तच आणि बॅड टचचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाला पुणे (Pune) येथून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी 1800 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे. हा विशेष उपक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला होता. संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविण्यात येण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर प्रयत्न करणार आहे.
राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी “सॅनिटरी नॅपकिन बँक, आपल्या आरोग्यासाठी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थिनींना यावेळी गुड टच आणि बॅड टचचे प्रशिक्षण देखील दिले जात आहे. या प्रशिक्षणानंतर दारमहिन्याला सॅनिटरी पॅडचे वाटप होणार आहे.
या उप्रक्रमा दरम्यान शाळा – कॉलेज यांच्याशी समन्वय ठेवला जात आहे. प्रत्येक विद्यार्थिनीची नोंद करून तिला ओळखपत्र दिले जात आहे.
त्यानंतर दर महिन्याला ओळख पत्र दाखवत, नोंद करुन घेत शाळा-महाविद्यालयातच विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वाटप होणार आहे.
नुकतेच पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकीन बॅंकसाठी नोंदणी संदर्भात आणि मुलींना गुड टच-बॅड टचचे धडे देण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित डॅाक्टरांच्या टीमकडून मुलींना सॅनिटरी नॅपकिनचा वापर, चांगले आरोग्य राखण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले.
मुलींना योग्य शिक्षण मिळाले तर सक्षमतकडे वाटचाल सुरु राहते असे रूपाली चाकणकर यांनी म्हंटले आहे.
याशिवाय त्यांच्या शिक्षणात, आरोग्यात अडथळे येउ नये यासाठी आयोगाकडून सॅनिटरी नॅपकीन बॅंक उपक्रम सुरु करण्यात आल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.