Gopichand Padalkar : रोहित पवारांनी संस्कृती शिकवू नये, त्यांचे कार्यकर्ते शोधा आणि फोडाचे आदेश काढतात, गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
तुम्ही महाराष्ट्राला संस्कृती शिकवू नका. तुम्ही जे पेरताय ते उगवते. तुमचा कार्यकर्ता शोधा आणि तोडा असे आदेश काढतो, काल सदाभाऊ बोलत असतान तुम्ही तिथे जाऊन विरोध करताय. एवढा माज एवढी मस्ती कुठून येते? रोहित पवार तुम्ही अजून लहान आहात तुम्ही महाराष्ट्राला सल्ले देऊ नकात, असे म्हणत त्यांनी पलटावर केला.
सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी पुन्हा रोहित पवार (Rohit Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पुण्यातल्या धक्काबुक्कीच्या प्रकरणावरून आता वार पलटवार सुरू झाले आहेत. रोहित पवारांच्या टीकेवर पलटवार करताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, – कोण रोहित पवार? रोहित पवारांना जरा तरी लाज वाटली पाहिजे. तुमच्या कार्यकर्त्याने माझ्या गाडीवर दगड फेकला तर त्याचा सत्कार तुम्ही केलात आणि आम्हास संस्कृती सांगताय. तुम्ही महाराष्ट्राला संस्कृती शिकवू नका. तुम्ही जे पेरताय ते उगवते. तुमचा कार्यकर्ता शोधा आणि तोडा असे आदेश काढतो, काल सदाभाऊ बोलत असतान तुम्ही तिथे जाऊन विरोध करताय. एवढा माज एवढी मस्ती कुठून येते? रोहित पवार तुम्ही अजून लहान आहात तुम्ही महाराष्ट्राला सल्ले देऊ नकात, असे म्हणत त्यांनी पलटावर केला.
सुप्रिया सुळेंवरही हल्लाबोल
तसेच सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली आहे. राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला त्यावर कारवाई का नाही झाली? पूजा चव्हाण प्रकरणावेळी कुठे होत्या सुप्रिया सुळे? असे सवाल त्यांनी केले. तसेच तुमचे कार्यकर्ते स्मृती इराणी, सदाभाऊ यांच्यावर जाऊन हल्ल्याचा प्रयत्न करतात. पोलिसांच्या ताब्यात असताना केतकीवर हल्ले करता, का तर पोलीस तुमचे ऐकतात म्हणून? तसेच एका घटनेत एक गुन्हा दाखल झाला ठीक आहे, पण 13 गुन्हे कशासाठी दाखल करता? कायदेशीर कारवाई होऊ द्या पण तुम्ही हल्ले करताय ही कुठली पद्धत? जेव्ह जेव्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सत्ता येते तेव्हा तेव्हा सर्वसामान्य लोकांवर अन्याय होतो, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
ओबीसींच्या आरक्षणाचा खून
दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खून महाविकास आघाडी सरकारने केला. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले पाहिजे असा सरकारचा डाव महाविकास आघाडी सरकार करतंय. मागासवर्ग आयोग 18 महिने सरकारने स्थापन केला नाही. वारंवार ओबीसी इंपेरिकल डेटा द्यावा लागेल असे सांगूनही सरकारने ते केले नाही. 435 कोटींची मागणी केली. मात्र सरकारने केवळ 5 कोटी आणि 88 कोटी दिले आणि नंतर ते माघारी घेतले. यांना ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाचा खून करायचा आहे आणि त्यांनी तो केला आहे. ओबीसी जागा यांना यांचे चमच्यांना द्यायच्या आहेत.
सरकारने ठरवून केले नाही
ओबीसींचं घर दिवसा रॉकेल टाकून पेटवून द्यायचा प्रयत्न शरद पवारांच्या माध्यमातून केला जातोय. तसेच मध्यप्रदेशचा विषय वेगळा आहे तिथे लवकरच ओबीसी आरक्षण प्रस्थापित होईल. 105 ठिकाणी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या आणि ओबीसींना संधी दिली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत इंपिरिकल डेटा गोळा करण्याचे सांगितले होते मात्र सरकारने ठरवून ते केले नाही. आज ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवले उद्या शिक्षणातले आरक्षण रद्द करतील, अशी भितीही पडळकरांनी व्यक्त केली आहे.