चुंबन, चॅटिंग आणि लॉज, पडळकरांनी काढली पोलिसांची प्रकरणं, नेमके आरोप काय?

आज सर्वात लक्षवेधी भाषण ठरलं ते भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं (Gopichand Padalkar) . कारण त्यांनी पोलिसांवर (Pune Police Crime) अनेक गंभीर आरोप केले आहेत.

चुंबन, चॅटिंग आणि लॉज, पडळकरांनी काढली पोलिसांची प्रकरणं, नेमके आरोप काय?
पडळकरांनी पोलिसांची प्रकरणं काढलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 4:53 PM

मुंबईविधिमंडळाच्या अधिवेशनात (Assembly Session)  आज सर्वात लक्षवेधी भाषण ठरलं ते भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं (Gopichand Padalkar) . कारण त्यांनी पोलिसांवर (Pune Police Crime) अनेक गंभीर आरोप केले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र अत्यंत खालच्या थराला गेले आहे. हे राज्याने पाहिले आहे.असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला आहे. बारामतीतला शिंदे नावाचा एक पोलीस निरीक्षक एका तरूणीला घेऊन लॉजवर जातो. लॉजवर गेल्यावर ती तरूणी त्याचे चित्रिकरण करते. ते चित्रिकण सोशल मीडियावर व्हायरल होतं. त्यानंतर त्याची बदली नेते करतात. मग त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? आणि त्याने गुन्हा नसेल केला तर त्याची तडकाफडकी बदली का केली? आणि बदली केली तर गुन्हा का दाखल होत नाही? असे सावल करत पडळकरांनी गृहविभाग आणि पोलीस खात्याला घेरलं. कोण त्याला पाठिशी घालतंय? कशासाठी पाठिशी घालतंय? याचे उत्तर गृहमंत्र्यांनी जनतेला द्यावे, असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.

पडळकरांनी सांगितला चुंबन आणि धमकीचा किस्सा

एवढा एकच नाही तर पडळकरांनी सरकारी कार्यालयातला दुसराही एक किस्ता सांगितला आहे. एक मुलगी सरकारी कार्यालयात टेबलावर बसली आहे. एक माणून येतो तिचे चुंबन घेतो आणि पळून जातो. ती मुलगी पाठिमागे पळतेय शिव्या देत. मात्र अजूनही त्याचा तपास झाला नाही. त्याच्यात गुन्हा दाखल झाला नाही. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आले आहे. मात्र तरीही कुणतरी म्हणतं तो तिथं कायतर चोरी करायला गेला असेल. अशी उत्तरं देता? असे म्हणत त्यांनी हल्लाबोल चढवला. तसेच एका पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलेल्या महिलेला तिच्या नवऱ्यापासून तोडल्याचा आणि तिच्या नवऱ्याला धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पोलिसांवर गंभीर आरोप

दौडमध्ये डीवायएसपीच्या विरोधात एका महिलने विनयभंगाची तक्रार केली. तेव्हा एसपीने सांगितलं सेटलमेंट करा. ती महिला अधिवेशनावेळी अंगावर रॉकेल ओतून घेते ही अवस्था कायदा आणि सुव्यवस्थेची झाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. यात पुण्यातले एसपी पुढाकार घेत आहेत. हा माणूस कार्यालयातून बाहेरच पडत नाही. मी यांचे सर्व्हिस रेकॉर्ड बघितले. हा माणूस पोलिसांचा शत्रू आहे. एका कॉन्स्टेबल महिलेने पोलीस निरीक्षकाविरोधात लेखी तक्रार दिली. हा लैंगिक अत्याचार करतो, हा जातिवाचक शिव्या देतो. याविरोधात तिने धाव घेतली. मात्र अजूनही त्यात तक्रार दाखल झाली नाही. अशी प्रकरणं काढत पडळकरांनी गृहखात्याचे वाभाडे काढले आहेत.

पवारांवर नाव न घेता निशाणा

एक सरकारी वकील आणि नेते विरोधी पक्षनेते संपवायला कारस्थान रचत आहेत. त्यांचे चेहरे आता समोर आले आहेत. ज्यांचा राजकीय उदय पाठीत खजीर खूपसून झालाय. ज्यांची राजकीय कारकिर्द पूर्ण रक्तबंबाळ आहे, असे म्हणत पडळकरांनी नाव न घेता पवारांवर निशाणा साधला आहे. आता राम नाम सत्य व्हायची वेळ आली असताना ज्यांच्या असे धंदे पुढे आले आहेत. त्यांच्यावरचे आरोप खरे ठरले आहेत. असा टोला त्यांनी लगावला. मात्र फडणवीसांना संपवणे सोपे नाही. त्यांनी केलेले काम लोकांसमोर आहे. फडणवीसांचे नाव ऐकूनच यांना कापरं भरतंय. त्यामुळे हे असे पाठीत वार करत आहेत. मात्र याचा काहीही उपयोग होणार नाही, असेही पडळकर म्हणाले.

दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलीस अधिकाऱ्याचा टॅटू, महिलांच्या सुरक्षेवरून पडळकरांनी काढले वाभाडे

उद्धवजी, तुमचं-आमचं नसेल जमत ते सोडून द्या, पण एक दिवस बाळासाहेबांना उत्तर द्यावं लागेल: देवेंद्र फडणवीस

गावा-गावात संघर्ष करू, रस्त्यावर उतरू, तुम्हाला फिरणं मुश्कील करून टाकू, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा इशारा

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...