गोसेखुर्द धरणातील पाणी विसर्गामुळं ब्रह्मपुरीतील गावं पूरमय; 15 गावातील शेतीशिवारं पाण्याखाली; अनेक मार्गावरील वाहतूक बंद

गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे त्याचा फटका नदीशेजारी असणाऱ्या गावाना बसत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ आता भीतीच्या सावटा खाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.

गोसेखुर्द धरणातील पाणी विसर्गामुळं ब्रह्मपुरीतील गावं पूरमय; 15 गावातील शेतीशिवारं पाण्याखाली; अनेक मार्गावरील वाहतूक बंद
चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला; अनेक गावं पूरमय
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 10:42 AM

चंद्रपूर : गोसेखुर्द धरणातून (Gosekhurd Dam) मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत (Vainganga River) पाण्याचा विसर्ग होत असल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील (Brahmapuri Taluka) काही गावांना पुराचा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पूरमय परिस्थितीमुळे रस्ते पाण्याखाली आले असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पुराच्या पाण्याचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अर्हेर-पिंपळगाव आणि बेलगावामध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीसह नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पुराचे पाणी 15 गावातील शेतीशिवारात

या पाण्यामुळे रणमोचन, चिखलगाव, बेटाळा, खरकाडा, चिंचोली यासारख्या नदी शेजारी असलेल्या जवळपास 15 गावातील शेतीशिवरात पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत झाले आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठी आणि नदीशेजारी असणाऱ्या गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.

गोसेखुर्द धरणातून पाणीविसर्ग वाढवला

मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर आणि गोसेखुर्द धरणातून पाणीविसर्ग वाढवण्यात आल्यानंतर त्यांचा फटका नदीशेजारीला गावांना बसत असतो. त्याचप्रमाणे सप्टेंबर 2020 मध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगेच्या किनारी असलेल्या गावांना मोठा फटका बसला होता, त्या पुराच्या मोठा तडाख्यात अनेक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान सहन करावे लागले होते.

नदीशेजारी असणाऱ्या गावाना फटका

गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे त्याचा फटका नदीशेजारी असणाऱ्या गावाना बसत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ आता भीतीच्या सावटा खाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून पुराचे पाणी शेतीशिवारासह काही वस्तीतून शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.