सरकार धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करतंय – जितेंद्र आव्हाडांचा आरोप
मरणारा तर गेला, त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळं होईल, हे आम्ही विधानसभेच्या सुरूवातीलाच बोललो होतो. मेलेल्याला जात असते का ? संतोष देशमुख प्रकरणात माणुसकीची हत्या झाली आहे,
मरणारा तर गेला, त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळं होईल, हे आम्ही विधानसभेच्या सुरूवातीलाच बोललो होतो. मेलेल्याला जात असते का ? संतोष देशमुख प्रकरणात माणुसकीची हत्या झाली आहे, त्यांना जाळून मारलंय. या सगळ्या प्रकरणाची घृणा राज्यभरात पसरली आहे, त्यात जात आणू नका. आम्ही संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि 302 मध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा अशी आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
याच्या आधी झालेल्या सर्व गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे. याआधी बीडमध्ये जे गुन्हे झालेत ते सर्व उघड झाले पाहिजेत. सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातलं वातावरण प्रचंड तापलं आहे.विरोधकांकडून सातत्याने याप्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं जात असून आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. यामध्ये भाजपचे सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांचा समावेश होता. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधनाता आव्हाड यांनी हा आरोप केला.
अंबादास दानवे
संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सर्व पक्षाचे नेते मंडळीनी राज्यपालांची भेट घेतली. बीडच्या घटनेतले चौकशी अधिकारी बदलले पाहिजेत, चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधित आहेत, त्यांचे इंटरेस्ट आहेत तिथे, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांची बदली झाली पाहिजे आणि जो राज्य स्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा असेल अशा आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची तिथे नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.या प्रकणातील सगळी संशयाची सुई ज्यांच्याकडे वळेत, ज्याचा याला राजकीय आशीर्वाद आहे, ते नाव धनंजय मुंडेंच आहे, त्यामुळे मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशा मागण्या आम्ही राज्यपालांकडे केल्याचं दानवे यांनी स्पष्ट सांगितलं.