एकनाथ शिंदे हे अमिताभ बच्चन यांच्यासारखे सुपरस्टार, ‘जंजीर’ तोडली, ‘दीवार’ पाडली… राज्यपालांकडून मुक्तकंठाने स्तुती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सर्व काम करत आहेत. मी सुद्धा तुमच्यासोबत काम करेन आणि आपण महाराष्ट्राला जपान आणि जर्मनी सोबत नेऊन ठेवू, असं सांगतानाच मी इथे राज्यपाल म्हणून आलो नाही. मी इथे एक सामान्य नागरिक म्हणून आलो आहे, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचं काल प्रकाशन झालं. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांची मुक्तकंठाने स्तुती केली. लोकांच्या गराड्यात राहणारा मुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली. तर राज्यपाल राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे यांची थेट सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केली. एकनाथ शिंदे हे अमिताभ बच्चन यांच्यासारखे सुपरस्टार असल्याचं राधाकृष्णन म्हणाले.
मुख्यमंत्री एकनात शिंदे यांच्यावरील हे आत्मचरित्र वाचल्यानंतर तरुण पिढी फक्त प्रेरित होणार नाही, तर तरुणांना ऊर्जाही मिळणार आहे. सामान्य रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री बनतो. हीच या लोकशाहीची खासियत आहे. आणि एक चहावाला देशाचा पंतप्रधान बनतो आणि जगात नाव कमवतो हे आमचे गुरुजी नरेंद्र मोदी आहेत. भारताची लोकशाही ही जगातील सर्वात ताकदवान लोकशाही आहे. अशा घटनांमुळे ती अधिक बळकट होते, असं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले.
शिंदे यांचे दोन गुरू
तुमचं माझ्यासाठी काम करणारा आणि खूप मोठा त्याग करणारा असा माणूस मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. एक नेता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या जडणघडणीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दीघे यांचा मोठा वाटा आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांचे गुरु होते. त्यांनी शिंदे यांना कष्ट करण्यास शिकवले. आनंद दिघे यांचं व्यक्तिमत्त्व कठोर आणि आक्रमक असं होतं. तर धर्म आणि हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करणारा नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची जगभर ओळख आहे, असं राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले.
सध्या दोन सुपरस्टार
सध्या दोन सुपरस्टार आहेत. एक म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरे अमिताभ बच्चन. एकनाथ शिंदे यांनी अमिताभ बच्चन सारखी जंजीर तोडली आणि दीवार तोडून पार गेले अन् राज्याचे मुख्यमंत्री झाले. ते आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या हृदयात आम्ही बसले आहेत. अमिताभ बच्चन यांचे दोन व्यक्तिमत्त्व आपल्याला चित्रपटसृष्टीत पाहायला मिळतात. आनंद चित्रपटात एक साधासुधा माणूस आणि एक नंतर अँग्री यंग मॅन अशा प्रकारचे दोन व्यक्तिमत्व अमिताभ बच्चन यांची आपण सिनेमात पाहिली. एकनाथ शिंदेही असेच आहेत. साधेसरळ आणि कामाच्या बाबतीत आक्रमक, असा गौरव त्यांनी केला.
मी असं ऐकलंय की…
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे विधानसभेतील भाषण मी ऐकले. ते ऐतिहासिक भाषण होते. मी असं ऐकलं आहे की, एकनाथ शिंदे झोपत नाहीत. मी ऐकलं आहे की, पहाटे सुद्धा लोक त्यांना भेटायला येतात. कोरोना काळात सुद्धा एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले. ते हॉस्पिटलमध्ये पीपीटी किट घालून जायचे. मंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या शिक्षण पूर्ण केले. लोकांना ज्या गोष्टीत रस आहे त्याच गोष्टीत एकनाथ शिंदे यांना सुद्धा रस आहे, असही राज्यपाल म्हणाले.