भंडारा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्यपालांकडून प्रत्येकी दोन लाख; पीडितांचे केले सांत्वन
मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू (Governor Visits Civil Hospital at Bhandara) अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे निर्देश राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी दिले. तसेच, मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले (Governor Visits Civil Hospital at Bhandara).
राज्यपाल कोश्यारी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके इत्यादी उपस्थित होते. गेल्या शनिवारी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुणालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. तसेच, सात बालकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले.
वाचलेल्या बालकांच्या कक्षाला राज्यपाल कोश्यारी यांनी भेट देवून बाळांच्या मातांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. बालक आणि मातांची योग्य काळजी घेण्याची सूचना यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त आयसीयू कक्षाला भेट दिली. ही पाहणी केल्यानंतर कोश्यारी यांनी या घटनेत मृत पावलेल्या प्रत्येक बालकांच्या कुटुंबीयांना स्वेच्छानिधीतून दोन लाख रुपये मदत देण्यासंदर्भात सूचना दिल्या (Governor Visits Civil Hospital at Bhandara).
राज्यपाल कोश्यारी यांनी जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्याकडून त्यांनी रुग्णालयातील आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती घेतली. विविध संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी राज्यपालांना भेटून या घटनेसंदर्भात निवेदन दिले.
Bhandara Fire |”अखेर दिवस उजाडल्यावर दुःखद बातमी आली आणि आईच्या पायाखालची जमीन सरकली”https://t.co/AwW3DmR7Bn#vandanasidam | #Bhandarafire | #BhandaraHospitalfire| #uddhavThackeray | #rajeshtope| @OfficeofUT | @NANA_PATOLE
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 10, 2021
Governor Visits Civil Hospital at Bhandara
संबंधित बातम्या :
हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही; भंडारा दुर्घटनेने मुख्यमंत्री भावुक
Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री
Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा- भाजप