पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन औरंगाबाद आणि नागपूरमध्ये आघाडीत बिघाडी? बंडखोरीची शक्यता

नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीकडून काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. | graduate constituency election 2020

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन औरंगाबाद आणि नागपूरमध्ये आघाडीत बिघाडी? बंडखोरीची शक्यता
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 8:45 AM

नागपूर: पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारीवरून आता नागपूर आणि औरंगाबादमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते एकमेकांना सहकार्य करण्यास तयार नाहीत. एवढेच नव्हे तर दोन्ही ठिकाणी परस्परांविरोधात बंडखोर उमेदवार उभे केले जाण्याची शक्यता आहे. (graduate constituency election 2020 in Maharshtra)

नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकासआघाडीकडून काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. आत राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीने रिंगणात स्वतंत्र उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु केल्याचे समजते. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून केवळ दबावतंत्रासाठी ही खेळी करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही महाविकास आघाडीतील परिस्थिती फारशी आलबेल नाही. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही, यावरून काँग्रेसचे अद्याप तळ्यात-मळ्यात सुरु आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतही काँग्रेसने अद्याप राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीवेळी काँग्रेस नेते काय भूमिका घेतात, हे आता पाहावे लागेल.

पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयाद्यांमध्ये गोंधळ पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मतदारसंख्या वाढवण्यावर भर दिला आहे. मतदारांच्या कागदपत्रांच्या प्रती साक्षांकित नसतानाही ऑनलाईन आलेले हजारो अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यापूर्वी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मतदारांच्या साक्षांकित प्रती नसल्यास संबंधित मतदारांचे अर्ज नामंजूर करण्याचे आदेश दिले होते.

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी वंचितकडून उमेदवारी जाहीर, कोणाला संधी? वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद, पुणे आणि नागपूरच्या पदवीधर निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. औरंगबादमधून नागोराव पांचाळ, पुण्यातून सोमनाथ साळुंखे, नागपूरातून राहुल वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातून वंचितने सम्राट शिंदे यांना संधी दिली आहे.

संबंधित बातम्या:

चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये खरी लढत

पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर; अभिजीत वंजारी, जयंत आसगावकरांना तिकीट

पदवीधर निवडणूक : भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज, माजी जिल्हाध्यक्षाचाही बंडाचा झेंडा

(graduate constituency election 2020 in Maharshtra)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.