Gram Panchayat Election 2022 Result Live : बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा दारूण पराभव

| Updated on: Dec 21, 2022 | 6:13 AM

Gram Panchayat Election 2022 Result Live Updates in Marathi : ग्रामपंचायतींचा निकााल आणि दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी...

Gram Panchayat Election 2022 Result Live : बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा दारूण पराभव

आज मंगळवार, 20 डिसेंबर 2022. राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं.  या ग्रामपंचायतींचा आज निकाल (Gram Panchayat Election 2022 Result Live Updates in Marathi) आहे. महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदेंगट दोन्हींकडून विजयाचा दावा केला जात आहे. त्यामुळे गुलाल कुणाचा यावरच आज गावागावातील पारावर चर्चा होणार आहे. दुसरीकडे विधिमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते

अनेक ग्रामपंचायतीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष आहे. तर अनेक ठिकाणी राज्यातील बड्यानेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. भाजप-शिंदेगट आणि महाविकास आघाडी यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

यासह राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये आणि गावखेड्यामध्ये काय घडतंय याकडे लक्ष असेल. विविध घडामोडींच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून मिळतील…

प्रत्येक क्षणाचे बदलते आकडे पाहण्यासाठी –

https://youtu.be/04y0H01GTg0

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Dec 2022 05:00 PM (IST)

    आष्टी तालुक्यातील शिराळगाव राष्ट्रवादीच्या ताब्यात

    बीड: शिराळगाव हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब अजबे यांचे,

    आमदार सुरेश धस यांच्या पॅनलचा दारुण पराभव,

    अजबे यांच्या पॅनलचा मोठ्या मताधिक्याने विजय.

  • 20 Dec 2022 03:35 PM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मोठा धक्का

    येवला, नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मोठा धक्का,

    नाशिकच्या माजी पालकमंत्र्यांचा स्वतःच्याच मतदारसंघात दारुण पराभव,

    भुजबळांच्या येवला मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व,

    सात पैकी फक्त एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीला मिळवता आला विजय.

  • 20 Dec 2022 03:18 PM (IST)

    gram panchayat result live : मंत्री संदिपान भुमरे यांच्या लेकीचा विजय, प्रेरणा पंडित यांना मोठं मताधिक्य…

    मंत्री संदिपान भुमरे यांच्या कन्येचा विजय

    गेवराईच्या दैठण गावातून विजय

    प्रेरणा पंडित यांचा मोठ्या मताधिक्याने विजय

    दैठण गावावर राष्ट्रवादीचा झेंडा

    अमरसिंह पंडित यांच्या पॅनलचा दणदणीत विजय

    आमदार लक्ष्मण पवार, बदमराव पंडित यांच्या पॅनलचा पराभव

  • 20 Dec 2022 03:09 PM (IST)

    gram panchayat election result 2022 live : नांदगावमध्ये नितेश राणे यांनी गड राखला

    नांदगावमध्ये नितेश राणे यांनी गड राखला

    शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांना धक्का

    भाजपच्या 9 जागा आणि सरपंचदेखील भाजपचा

    तर ठाकरे गटाला केवळ एक जागा

    भाजपचे रविराज उर्फ भाई मोरजकर भाजपचे सरपंच

  • 20 Dec 2022 03:06 PM (IST)

    बीडमध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा दारूण पराभव

    बीड: बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा पराभव

    हर्षदा सोनवणे यांचा पुन्हा पराभव

    सारणी आनंदगाव काँग्रेसच्या ताब्यात

    काँग्रेसने केजमधून खाते उघडले

    काँग्रेसच्या प्रविना संतोष सोनवणे 109 मतांनी विजयी

    हर्षदा बजरंग सोनवणे यांचा नगरपंचायत निवडणुकीतही झाला होता दारुण पराभव

  • 20 Dec 2022 03:03 PM (IST)

    gram panchayat election result live : माहूर दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश 

    माहूर दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश

    80 पैकी वीस हुन अधिक गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विजयी

    भाजप आमदार भीमराव केराम यांना मोठा धक्का

  • 20 Dec 2022 03:01 PM (IST)

    gram panchayat election maharashtra live : जळगाव जिल्ह्यातील भडगाव ग्रामपंचायतीचा निकाल

    जळगाव जिल्ह्यातील भडगाव ग्रामपंचायतीचा निकाल खालीलप्रमाणे-

    एकुण ग्रामपंचायत- 6

    निकाल -06

    शिवसेना – 00

    शिंदे गट – 03

    भाजप- 01

    राष्ट्रवादी- 02

    काँग्रेस- 00

    इतर-00

  • 20 Dec 2022 02:58 PM (IST)

    maharashtra gram panchayat election result live : पारनेर-नगर मतदारसंघात आमदार निलेश लंकेंची बाजी

    अहमदनगरच्या पारनेर-नगर मतदारसंघात आमदार निलेश लंकेंची बाजी

    16 पैकी 13 ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

    पारनेर मतदारसंघात आमदार निलेश लंके यांचे वर्चस्व

  • 20 Dec 2022 02:57 PM (IST)

    Live gram panchayat result : यवतमाळमध्ये भाजप आमदार अशोक उईके यांना धक्का

    यवतमाळमधील राळेगाव विधानसभा मतदारसंघातील 8 पैकी 5 वर काँग्रेस तर 2 ठिकाणी भाजप 1 ठिकाणी शिंदेगट

    भाजपचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना धक्का

    2 ग्रामपंचायती भाजपला तर काँग्रेसचे माजी शिक्षणमंत्री पुरके गटाची 5 ग्रामपंचायतीवर आघाडी

    1 ग्रामपंचायत वर शिंदे गटाचे वर्चस्व

  • 20 Dec 2022 02:54 PM (IST)

    gram panchayat election result live : गडचिरोली ग्रामपंचायती निवडणुकीचे निकाल

    गडचिरोली ग्रामपंचायतीचे निकाल -27/23

    ग्रामपंचायतचा निकाल खालील

    शिवसेना – 00

    शिंदे गट – 02

    भाजप- 04

    राष्ट्रवादी- 03

    काँग्रेस- 03

    मनसे – 00

    वंचित – 00

    इतर- 10

    तिसरी महाविकास आघाडी-01

    चामोर्शी तालुक्यात चारपैकी दोन ग्रामपंचायतीवर शिंदेगटाची सत्ता

    विजयी सरपंच

    मार्कंडा देव ग्रामपंचायत सविता राजू मोगरे

    ठाकरे ग्रामपंचायत वर सौ नंदा दादाजी कुळसंगे

  • 20 Dec 2022 02:48 PM (IST)

    मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांचा दबदबा कायम

    मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघात 7 ग्रामपंचायत पैकी 6 ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा विजय,

    मुक्ताईनगर तालुक्यात एक कु-हा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात तर बोदवड तालुक्यात 5 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय,

    एकनाथ खडसेंनी जिल्हा दूध संघाच्या पराभवानंतर ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवल्या आहे,

    एकनाथ खडसे यांनी मतदारसंघात शिंदे गटआणि भाजपाला धक्का दिला आहे.

  • 20 Dec 2022 02:47 PM (IST)

    gram panchayat election maharashtra 2022 live : नांदेडच्या मुखेड तालुक्यात भाजपचं वर्चस्व

    नांदेडच्या मुखेड तालुक्यातील सर्व 16 ग्रामपंचायतचे निकाल जाहीर

    दहा ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व, तर दोन जागी काँग्रेसला यश

    चार जागेवर स्थानिक आघाडीचा विजय

  • 20 Dec 2022 02:45 PM (IST)

    Beed gram panchayat election result live : बीडच्या 30 ग्रामपंचायतीवर संदीप क्षीरसागर यांची आघाडी

    बीडच्या 30 ग्रामपंचायतीवर संदीप क्षीरसागर यांची आघाडी

    राजुरीसह तीस ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

    काका जयदत्त क्षीरसागर यांचा मोठा पराजय

    पुतणे संदीप क्षीरसागर यांची सरशी

  • 20 Dec 2022 02:43 PM (IST)

    sangli gram panchayat election results live : सांगलीत भाजपची आघाडी

    सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल

    एकूण जागा 447 / 226 निकाल

    भाजप =59

    ठाकरे गट – 1

    शिंदे गट – 27

    राष्ट्रवादी = 45

    कॉग्रेस = 32

    इतर – 24

    बिनविरोध – 38

  • 20 Dec 2022 02:40 PM (IST)

    बीडमधील कुटेवाडीत भाजप-शिंदे गटाचा धुव्वा

    बीडमधील कुटेवाडीत भाजप-शिंदे गटाचा धुव्वा

    461 मताने ठाकरे गटाचा उमेदवारी विजयी

    ठाकरे गटाच्या जयश्री गणेश वरेकर यांचा दणदणीत विजय

    अन्य 15 ठिकाणी ठाकरे गट आघाडीवर

    विजयानंतर ठाकरे गटाचा जल्लोष

    उद्धव ठाकरेंच्या नावाने कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

  • 20 Dec 2022 02:39 PM (IST)

    Pune district gram panchayat election result live : पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष

    पुणे जिल्ह्यात 105 जागा ग्रामपंचायती जिंकत राष्ट्रवादी पहिल्या स्थानावर

    काँग्रेस दुसऱ्या नंबर 44 ग्रामपंचायती ठेवल्या ताब्यात

    शिवसेना ठाकरे गटाला 15 ग्रामपंचायती

    तर शिंदे गटाला 7 आणि इतर मिळून 13

    पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष

  • 20 Dec 2022 02:38 PM (IST)

    maharashtra gram panchayat election result live : विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना धक्का

    6 जागांवर काँग्रेसचं वर्चस्व

    तर 11 जागांवर भाजपाचा विजय

    थोरातांचे मूळगाव असलेले जोर्वे तसेच तळेगाव दिघे , घुलेवाडी , निळवंडे , निंभाळे , कोल्हेवाडी या ग्रामपंचायतमध्ये विखे पाटलांचा थोरातांना धक्का

    तर निमगाव जाळी , उंबरी-बाळापूर मध्ये थोरातांचा विखे पाटलांना धक्का

  • 20 Dec 2022 02:29 PM (IST)

    माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना धक्का

    माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना धक्का

    श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीत बबनराव पाचपुते यांचा पुत्र प्रतापसिंह पाचपुते यांचा पराभव

    तर पाचपुते यांचा पुतण्या साजन पाचपुते यांचा विजय

  • 20 Dec 2022 02:27 PM (IST)

    मिरज तालुक्यातील दुधगाव ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर 

    मिरज तालुक्यातील दुधगाव ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर

    राष्ट्रवादीला दणका देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजी

    राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातले दुधगाव ग्रामपंचायत

    राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ग्रामपंचायतवर फडकवला झेंडा

  • 20 Dec 2022 01:44 PM (IST)

    gram panchayat election result 2022 live : सांगलीतील खानापूर तालुक्याचा निवडणूक निकाल

    सांगली – खानापूर तालुका

    37 ग्रामपंचायत पैकी 30 ग्रामपंचायत निकाल जाहीर

    बाळासाहेबांची शिवसेना – 18

    राष्ट्रवादी काँग्रेस – 07

    भाजप – 01

    राष्ट्रवादी +भाजप – 01

    समिश्र – 03

  • 20 Dec 2022 01:37 PM (IST)

    हवेली तालुक्याचा निवडणूक निकाल…

    पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका

    एकूण ग्रामपंचायत 07

    लागलेले निकाल – 07

    शिवसेना – 01

    शिंदे गट – 00

    भाजप- 03

    राष्ट्रवादी- 03

    काँग्रेस- 0

  • 20 Dec 2022 01:35 PM (IST)

    बीड जिल्ह्यात शिंदे गटाची आघाडी

    24 ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात

    उद्धव ठाकरे गटाकडे केवळ 7 ग्रामपंचायती

    अनेक ग्रामपंचायतीचे निकाल अद्याप बाकी

    शिंदे गटाचा बीडमध्ये जल्लोष

    जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयात जल्लोष

    ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर तर भाजप दुसऱ्या स्थानी

  • 20 Dec 2022 01:28 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल

    पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल

    आतापर्यंत 143 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

    राष्ट्रवादीकडे सर्वाधिक 79जागा

    भाजपाकडे 27 ग्रामपंचायती

    काँग्रेसकडे 28 ग्रामपंचायती

    शिवसेनेकडे 4 ग्रामपंचायती

    तर शिंदे गटाकडे 5 ग्रामपंचायती

  • 20 Dec 2022 01:27 PM (IST)

    maharashtra gram panchayat election result live : औरंगाबाद जिल्हा ग्राम पंचायत निवडणूक निकाल

    औरंगाबाद जिल्हा ग्राम पंचायत निवडणूक निकाल

    ठाकरे गट : 28

    शिंदे गट : 52

    भाजप : 44

    काँग्रेस : 09

    राष्ट्रवादी : 14

    इतर : 23

    216 पैकी 170 निकाल जाहीर

  • 20 Dec 2022 01:21 PM (IST)

    live gram panchayat result : कंधार तालुक्यात भाजपचे वर्चस्व

    कंधार तालुक्यात भाजपचे वर्चस्व

    16 पैकी 13 जागी भाजप विजयी

    खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व सिद्ध

  • 20 Dec 2022 01:20 PM (IST)

    बीड जिल्ह्यात शिंदे गटाची आघाडी

    24 ग्रामपंचायती शिंदे गटाच्या ताब्यात

    उद्धव ठाकरे गटाकडे केवळ 7 ग्रामपंचायती

    अनेक ग्रामपंचायतीचे निकाल अद्याप बाकी

    शिंदे गटाचा बीडमध्ये जल्लोष

    जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयात जल्लोष

    ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पहिल्या क्रमांकावर तर भाजप दुसऱ्या स्थानी

  • 20 Dec 2022 01:18 PM (IST)

    ग्रामपंचायत निवडणूक निकाल, दोन गट भिडले, 25 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले

    दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज माळी नावाच्या 25 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

    घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी आणि प्रचंड आक्रोश

    या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

  • 20 Dec 2022 01:16 PM (IST)

    काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी राखला गड

    काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी राखला गड

    तळवेळ ग्रामपंचायत निवडणूक मध्ये 11 पैकी 10 काँगेस सदस्य विजयी

    अलका मिलींद बोंडें सरपंच पदी विजयी

    बच्चू कडू यांची तळवेल गावातील सत्ता गेली

  • 20 Dec 2022 01:13 PM (IST)

    मेळघाटात आमदार राजकुमार पटेल यांच्या पुतणी सरपंचपदी विजयी

    मेळघाटमधील प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या भावाची मुलगी सरपंचपदी विजयी

    अस्मिता नरेंद्र कुमार पटेल झिल्पी ग्रामपंचायत मधून 535 मतांनी झाल्या विजयी

  • 20 Dec 2022 01:12 PM (IST)

    अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक

    अहमदनगर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक

    माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी गड राखला

    नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतवर ठाकरे गटाची सत्ता

    नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत गडाखांनी राखल्या

    सर्व ग्रामपंचायतवर ठाकरे गटाचा वरचष्मा

  • 20 Dec 2022 01:11 PM (IST)

    फुलंब्री तालुक्यातील वाघलगाव ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकला

    औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वाघलगाव ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकला

    सरपंचपदी भाजपच्या लंकाबाई काकडे विजयी

    रावसाहेब दानवे – हरिभाऊ बागडे यांच्या मतदार संघातील लंकाबाई काकडे विजयी

  • 20 Dec 2022 01:10 PM (IST)

    gram panchayat election result live : विखे पाटलांनी आपला गड राखला

    विखे पाटलांनी आपला गड राखला

    अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतवर विखेंची सत्ता

    12 ग्रामपंचायतवर भाजपाच्या विखेंचा झेंडा

    स्थानिक पातळीवर विखे गटाच्या विरोधात विखे गटाचीच लढाई

    विखे पाटील गटाची 12 ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता

  • 20 Dec 2022 01:09 PM (IST)

    येवला तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर

    येवला तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर

    1.नांदेसर – सुनीता जाधव -भाजप

    2.कोटमगाव बुद्रुक – राजेंद्र काकळीज – इतर

    3.आडगाव चोथवा – रामकृष्ण खोकले – इतर

    4.नायगव्हाण – सुनील साळवे – (शिवसेना ठाकरे गट )

    5. योगिता  खापरे – एरंडगाव – राष्ट्रवादी

    6.कुसुर :- दिलीप मेगाळ बिनविरोध – (शिवसेना ठाकरे गट )

    7.चांदगाव – प्रवण साळवे – (शिवसेना ठाकरे गट

  • 20 Dec 2022 01:08 PM (IST)

    : ग्रामपंचायत निवडणुकीत tv9 मराठीचा बोलबाला

    ग्रामपंचायत निवडणुकीत tv9 मराठीचा बोलबाला

    टीव्ही9 मराठीला सर्वाधिक पसंती

    बीडमधील शिंदे गटाच्या कार्यालयात टीव्ही 9 मराठी पाहण्यास पसंती

    टीव्ही वर लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी मोठी गर्दी

  • 20 Dec 2022 01:04 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात 221 पैकी आतापर्यंत 74 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

    पुणे जिल्ह्यात 221 पैकी आतापर्यंत 74 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

    राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक 46 ग्रामपंचायती

    भाजपकडे 11 ग्रामपंचायत

    शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 6

    तर शिंदे गटाकडे 1 ग्रामपंचायत

    काँग्रेसकडे आतापर्यंत 15 ग्रामपंचायती

  • 20 Dec 2022 12:47 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंतच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं पारडं जड

    पुणे : जिल्ह्यात 221 पैकी आतापर्यंत 74 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर,

    राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक 46 ग्रामपंचायती,

    भाजपकडे 11 ग्रामपंचायत,

    शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाकडे 6,

    तर शिंदे गटाकडे 1 ग्रामपंचायत,

    काँग्रेसकडे आतापर्यंत 15 ग्रामपंचायती.

  • 20 Dec 2022 12:45 PM (IST)

    “आई तुला आवाज येतोय का?”, पडळकर मायलेकाचा tv9 मराठीच्या माध्यमातून संवाद

    “आई तुला आवाज येतोय का?”, गोपचंद पडळकर आणि हिराबाई पडळकर यांच्यात संवाद

    पडळकर मायलेकाचा tv9 मराठीच्या माध्यमातून संवाद

    गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजय

    पडळकरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत हिराबाई पडळकर यांचा विजय

  • 20 Dec 2022 12:41 PM (IST)

    gram panchayat election live : देवेंद्र भुयार यांच्या गव्हांनकुंड गावात त्याच्या पॅनलचा सरपंच विजयी

    आमदार देवेंद्र भुयार यांच्या गव्हांनकुंड गावात त्याच्या पॅनलचा सरपंच विजयी

    आमदार देवेंद्र भुयार यांच्य पॅनलचा दणदणीत विजय देवेंद्र भुयार यांनी गड राखला

    भाजपच्या उमेदवाराचा पराभव,  नीता राऊत विजयी

  • 20 Dec 2022 12:40 PM (IST)

    maharashtra gram panchayat election result live : बीडमधील सौंदाना गावात मनसेला धक्का

    बीडमधील सौंदाना गावात मनसेला धक्का

    मनसे नेते शिवराज बांगर यांचा पॅनल पराभूत

    मनसेचे सर्वच उमेदवार मोठ्या मतांनी पराभूत

    उद्धव ठाकरे गटाचा दणदणीत विजय

  • 20 Dec 2022 12:36 PM (IST)

    gram panchayat election maharashtra live : एकनाथ खडसेंनी गड राखला

    मुक्ताईनगर मतदारसंघात एकनाथ खडसेंनी गड राखला

    तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कु-हा ग्रामपंचायत महत्त्वाची ग्रामपंचायत होती

    कु-हा ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून बि सी महाजन यांचा विजय

    शिंदे गट आणि भाजपाला कु-हा ग्रामपंचायत मध्ये मोठा धक्का

  • 20 Dec 2022 12:31 PM (IST)

    gram panchayat election result live : नाशिकमधील ग्रामपंचायत निकाल

    नाशिकमध्ये एकूण ग्रामपंचायत 188

    आत्तापर्यंतचे निकाल

    भाजप – २६

    शिंदे गट – १२

    ठाकरे गट – १४

    राष्ट्रवादी काँग्रेस – २२

    काँग्रेस – ०७

    मनसे – ००

    स्वराज्य संघटना – ०२

    इतर – ०७

  • 20 Dec 2022 12:30 PM (IST)

    gram panchayat election result : करंजगव्हाण सहतीन गावांवर भाजपचे वर्चस्व

    पालकमंत्री दादा भुसे यांना स्वतःच्या मतदार संघातच पहिल्या फेरीत मोठा धक्का

    तीन ग्रामपंचायतीनमध्ये भाजपाचे वर्चस्व

    करंजगव्हाण सहतीन गावांवर भाजपचे वर्चस्व

  • 20 Dec 2022 12:28 PM (IST)

    रायगडमधील महाड तालुक्यात

    रायगडमधील महाड तालुक्यात 32 पैकी 19 ग्रामपंचयात शिंदे गटाकडे

    महाविकास आघाडीला केवळ 12 जागा

    एक जागा अपक्ष शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचे वर्चस्व

  • 20 Dec 2022 12:24 PM (IST)

    गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर यांचा दणदणीत विजय 

    गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्रीचा विजय

    हिराबाई पडळकर यांचा दणदणीत विजय

    पडळकरवाडी ग्रामपंचायतीत हिराबाई पडळकर यांचा विजय

  • 20 Dec 2022 12:20 PM (IST)

    ग्रामपंचायत निकाल, गडचिरोलीत कुणाचं वर्चस्व

    गडचिरोली ग्रामपंचायतीचे निकाल -27

    ग्रामपंचायतचा निकाल खालील

    शिवसेना – 00

    शिंदेगट – 00

    भाजप- 02

    राष्ट्रवादी- 02

    काँग्रेस- 01

    मनसे – 00

    वंचित – 00

    इतर- 9

  • 20 Dec 2022 12:18 PM (IST)

    कंधारमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

    कंधारमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

    आतापर्यंत अकरा ग्रामपंचायती भाजपकडे

    विजयी उमेदवारांचा प्रणिता चिखलीकर पाटील यांनी सत्कार केला

  • 20 Dec 2022 12:12 PM (IST)

    परळीत पंकजा मुंडेंना धक्का

    परळीत पंकजा मुंडेंना धक्का

    648 मतांनी नाथरा ग्रामपंचायत नाथरा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे अभय मुंडे विजयी

    नाथरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

  • 20 Dec 2022 12:04 PM (IST)

    उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

    प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘माझी जीवनगाथा’ हे पुस्तक दिले भेट

    पुस्तकात एखाद्या कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीक मागणे असाच अर्थ होतो, असा उल्लेख आहे.

    हा उल्लेख चंद्रकांत दादांनी उद्धव ठाकरेंना दाखवला.

  • 20 Dec 2022 11:46 AM (IST)

    जालना- ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा दबदबा

    केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासाठी प्रतिष्ठेची राजूर गणपती ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात

    औरंगाबादेत निल्लोड ग्रामपंचायतीत रावसाहेब दानवे यांच्या साल्याने मारली बाजी

    निल्लोड गावात भारतीय जनता पार्टीचे पॅनल विजयी

  • 20 Dec 2022 11:42 AM (IST)

    सख्ख्या मावस जावांना एकसमान मते, चिठ्ठी काढून मिळणार कौल

    औरंगाबाद : सख्ख्या मावस जावांना एकसमान मते

    गावाकऱ्यांचा कौल दोन्ही जावाना समान

    चिठ्ठी काढून मिळणार कौल

    औरंगाबाद जिल्ह्यातील गराडा गावातील निवडणूक निकाल

    कन्नड तालुक्यातील गराडा गाव

  • 20 Dec 2022 11:33 AM (IST)

    राष्ट्रवादी कॉँग्रेसचे मदार दिलीप बनकर यांना मोठा धक्का

    नाशिक : आमदार दिलीप बनकर यांनी दहा वर्षांची सत्ता गमावली,

    आमदार बनकर यांचे पुतणे गणेश बनकर पराभूत,

    ठाकरे गटाचे भास्कर बनकर थेट सरपंचपदी विजयी,

    भाजपचे सतीश मोर यांचाही पराभव,

    पिंपळगाव ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे.

  • 20 Dec 2022 11:29 AM (IST)

    ram panchayat election result 2022 : चाळीसगावच्या करजगाव ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपा उमेदवार

    चाळीसगावच्या करजगाव ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपा उमेदवार

    किशोर भिकनराव पाटील विजयी

    सदस्य बॉडीमध्ये देखील भाजपाला बहुमत

  • 20 Dec 2022 11:19 AM (IST)

    रत्नागिरी- दापोली तालुक्यात आमदार योगेश कदम यांचा दबदबा

    14 ग्रामपंचायतींवर शिंदे गटांचा विजय

    2 ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा झेडा

    वेळवी आणि कळंबट ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे

  • 20 Dec 2022 11:11 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये कॉँग्रेसने खातं उघडलं

    नाशिक : चांदवड तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कॉँग्रेसचा झेंडा,

    कॉँग्रेस पुरस्कृत संपूर्ण पॅनल विजयी, सरपंचपदी गोकुळ वाघ विजयी,

    राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपसह शिवसेनेच्या पॅनलचा दारुण पराभव,

    घोषणाबाजी करत, गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष.

  • 20 Dec 2022 11:00 AM (IST)

    जामनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा बोलबाला

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा बोलबाला,

    समोर आलेल्या निकालात बारा पैकी सात ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता,

    घोषणाबाजी करत गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष,

    जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर.

  • 20 Dec 2022 10:42 AM (IST)

    अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींचा निकाल

    अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील 2 ग्रामपंचायत निकाल

    पारनेरच्या एका ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

    काँग्रेसचे नेते नागवडे गटाच्या 2 तर

    पारनेर तालुक्यातील ढावळपुरी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे

  • 20 Dec 2022 10:25 AM (IST)

    गुजरातला यश मिळवून दिलं पण मुलीचा पॅनल पराभूत, भाविनी पाटील सदस्यपदी विजयी

    जळगाव : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी, मात्र त्यांचं ग्राम विकास पॅनल पराभूत,

    भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला 10 पैकी 3 जागा मिळाल्या,

    भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या, त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळालं आहे,

    मोहाडी ग्रामपंचायतच्या निकालाकडे जळगाव जिल्हा सह राज्याचं लक्ष लागून होतं,

    या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, परंतु निकालात त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.

  • 20 Dec 2022 10:18 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्याचा पहिला निकाल हाती

    नाशिक : यशवंतनगर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अगस्ती फडोळ विजयी,

    अगस्ती फडोळ यांच्या रुपानं भाजपाने विजयाचा श्रीगणेशा केला,

    नाशिक तालुक्यातील मत मोजणीला सुरुवात, यशवंतनगर ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात.

  • 20 Dec 2022 10:11 AM (IST)

    अहमदनगर जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात

    अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचा पाहिला कल हाती,

    संगमनेर तालुक्यातील 04 ग्रामपंचायती कॉग्रेसकडे,

    संगमनेर तालुक्यात विखे-थोरातांची प्रतिष्ठापणाला,

    37 ग्रामपंचायतीपैकी 14 ग्रामपंचायतीत विखे-थोरात गटात मोठी चुरस.

  • 20 Dec 2022 09:57 AM (IST)

    रत्नागिरीतून ग्रामपंचायत निवडणुकीचा दूसरा निकाल जाहीर

    रत्नागिरी: ग्रामपंचायत निवडणुकीचा दुसरा निकाल जाहिर,

    दुसऱ्या निकालाता सुद्धा ठाकरे गटाचा सरपंच,

    हेदवी ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाचा सरपंच विजयी,

    आर्या मोरे ठाकरे गटाच्या सरपंच विजयी.

  • 20 Dec 2022 09:52 AM (IST)

    Live- कोल्हापूर सरपंचांची निवड

    बामणी : पाटील अनुराधा मारुती – भाजप समरजीतसिंह घाडगे गट

    रणदिवेवाडी : भाजप, राहुल संपतराव खोत

    व्हनाळी : संजयबाबा घाडगे गट, कवडे दिलीप रामचंद्र

    निढोरी : भाजप, सुतार शुभांगी योगेश

    कसबा सांगाव : संजय मंडलिक गट, वीरश्री विक्रमसिंह जाधव

    नंद्याळ : मुश्रीफ गट, मनीषा सुरेश कांबळे

    दौलतवाडी : मंडलिक गट, जाधव शितल संदेश

  • 20 Dec 2022 09:35 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील 205 ग्रामपंचायतीची मतमोजणी

    10 वाजता होणार मतमोजणीला सुरुवात

    11 फेऱ्यांमध्ये 14 टेबलवरवरून होणार मतमोजणी

    मतमोजणी केंद्रावर कर्मचाऱ्यांची लगबग सुरू

    14 ग्रामपंचायती यापूर्वीच झाल्या आहेत बिनविरोध

  • 20 Dec 2022 09:33 AM (IST)

    कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत ही शिंदे गटाच्या ताब्यात

    कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत ही शिंदे गटाच्या ताब्यात

    संभाजीपूर मधूनही सरपंच पदाचे शिंदे गटाचे सचिन कुडे उमेदवार विजयी

  • 20 Dec 2022 09:31 AM (IST)

    कोल्हापूर- राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खोलले खाते

    हेरवाड ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता

    रेखा अर्जुन जाधव सरपंचपदी विजयी

  • 20 Dec 2022 09:12 AM (IST)

    कोल्हापूर – शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड

    माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे वर्चस्व

    अकिवाटमधून सरपंच पदाच्या वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी

    खिद्रापूरमधून सरपंच पदाचे उमेदवार सारिका कुलदीप कदम विजयी..

    टाकवडेमधून सरपंच पदाचे उमेदवार सविता मनोज चौगुले विजयी

  • 20 Dec 2022 09:06 AM (IST)

    राज्यातील पहिला निकाल हाती

    – कोल्हापुरात भाजपचा गुलाल

    -कागल तालुक्यातील बामणीत भाजपने खातं उघडलं

    – निकालात सत्तांतर ,मुश्रीफ गटाला धक्का

  • 20 Dec 2022 09:06 AM (IST)

    भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसाठी पुण्यात आज उपोषण

    पुणे : भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसाठी पुण्यात आज उपोषण,

    भिडे वाड्यासमोरच आज आज दिवसभर आंदोलनकर्ते करणार उपोषण,

    या उपोषणाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव देखील राहणार उपस्थित,

    भिडे वाडा ही इमारत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा.

  • 20 Dec 2022 08:13 AM (IST)

    जनता कुणाला देणार नारळ, कुणावर पडणार गुलाल, थोड्याच वेळात निकाल

    नाशिक : 188 ग्रामपंचायतींची मत मोजणी आज होणार

    जिल्ह्यात 80 टक्के मतदानाची सरासरी झाली होती नोंद

    जिल्ह्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

    सकाळी 10 वाजता तालुक्याच्या तहसील कार्यालयात होणार मतमोजणी

    या अगोदरच 8 ग्राम पंचायती बिनविरोध

  • 20 Dec 2022 08:07 AM (IST)

    जम्मू-काश्मीरमधील मुंझ मार्ग परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

    जम्मू-काश्मीरमधील मुंझ मार्ग परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

    एलईटीचे 3 दहशतवादी ठार

  • 20 Dec 2022 08:06 AM (IST)

    पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात जखमी झालेला बिबट शिरला कंपनीत,

    चाकण, पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर IAI इंडस्ट्रीज कंपनीच्या क्षेत्रात बिबट शिरल्याने खळबळ..

    चाकण वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असुन, रेस्क्यू ऑपरेशन सुरू,

    अपघातानंतर बिबट जखमी अवस्थेत कंपनीत शिरला असुन बिबट चिडलेल्या अवस्थेत,

    कंपनीत कामगारही अडकल्याची माहिती.

  • 20 Dec 2022 08:03 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींची आज मतमोजणी

    कोल्हापूर जिल्ह्यातील 430 ग्रामपंचायतींची आज मतमोजणी

    सरपंच पदाच्या 1 हजार 900 तर सदस्य पदाच्या 9 हजार उमेदवारांचा फैसला आज होणार

    करवीर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात होण्यास सुरुवात

    मतमोजणीची तयारी पूर्ण

    रमण मळ्यातल्या शासकीय धान्य गोडाऊनमध्ये  मतमोजणी होतेय

Published On - Dec 20,2022 7:58 AM

Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.