Hatkanangale Gram Panchayat Election Results 2021: कोल्हापुरात जनसुराज्यपाठोपाठ शिवसेनेची कमाल; मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

Hatkanangale Gram Panchayat Election Results 2021: कोल्हापुरात जनसुराज्यपाठोपाठ शिवसेनेची कमाल; मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 9:57 AM

इचरकलंजी: मातब्बर नेत्यांमुळे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे (gram panchayat election results 2021 ) चित्र क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेने कमाल करुन दाखविली आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

राधानगरीच्या बारवे ग्रामपंचायतीमध्ये प्रकाश आबिटकरांचे वर्चस्व

राधानगरी तालुक्यात शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकटवले होते. त्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बारवे ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी सहा जागांवर शिवसेनाप्रणित पॅनलने विजय मिळवला. तर हातकणंगले तालुक्यातील बिरदेववाडी मध्ये 7 पैकी 6 जागा शिवसेनेला मिळाल्या आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पाटणमध्ये 10 पैकी 6 ग्रामपंचायतींवर शंभुराज देसाई गटाचे वर्चस्व

पाटणमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या गटाने 10 पैकी 6 ग्रामपंचायतींवर भगवा फडकला. उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकट आणि महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक संकाटांच्या काळात केलेल्या कामाला मिळालेली ही पावती आहे. हे निकाल म्हणजे खेड्यापाड्यातील जनतेने उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व स्वीकारल्याचं प्रतिक आहेत, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.

निकालाचा पहिला मान कोल्हापुरात, पाडळीवर जनसुराज्यचा विजय

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

संबंधित बातम्या;

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | राज्यातील 10 मोठे निकाल, कुठे कोण जिंकलं?

Gram Panchayat Election Results 2021 : माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा धुराळा, 3 ग्रामपंचायतींवर विजयाचा झेंडा

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, पहिल्याच निकालात भाजपचा दणदणीत विजय

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.